Sourav Ganguly on MS Dhoni
esakal
मला ‘फेज टू’चा धोनी आवडत नाही, मला सुरुवातीचा मोठे षटकार मारणारा धोनीच आवडतो, असे विधान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने केले आहे. इतकेच नाही, तर धोनीची फलंदाजी पाहण्यासाठी तो जमशेदपूरला गेला होता, असा खुलासाही त्यांनी केला आहे. एका मुलाखतीत बोलताना गांगुलीने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या विधानानंतर क्रिकेट वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.