धक्कादायक:'फेक फेसबूक' पेजवरुन शेअर झाले गांगुलींच्या पत्नी आणि मुलीचे फोटो

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 17 February 2021

ओडिसी नृत्यांगना डोना गांगुली यांना त्यांच्या एका विद्यार्थीनीने फेक फेसबुक पेजची माहिती दिली.

भारतीय क्रिकेट मंडळाचे (BCCI) विद्यमान अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना यांनी 'फेक फेसबूकट पेजसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केलीय. डोना गांगुली यांच्या नावाने एक फेक ‘फेसबुक पेज’ तयार करण्यात आले आहे. याप्रकरणात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय अध्यक्षांची पत्नी डोना आणि त्यांची मुलगी सना यांचे अनेक फोटो फेक फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. याप्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असून दोषींना लवकरात लवकर पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

IPL Auction 2021 : अर्जुन पाहतोय मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचे स्वप्न

अकाउंट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या आयपी एड्रेस (इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता) माहितीच्या आधारावर दोषींचा शोध घेतला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले. ओडिसी नृत्यांगना डोना गांगुली यांना त्यांच्या एका विद्यार्थीनीने फेक फेसबुक पेजची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.  

चेहऱ्यावरचा भाव पाहिला; सोशल मीडियावर उसळली 'विराट' लाट

डोना यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, माझ्या नावाचा वापर करुन सौरव गांगुली यांच्या फोटोसह एक फेक फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. माझ्या एका विद्यार्थीनीकडून यासंदर्भातील माहिती मिळाली. माझा आणि दादाचा (सौरव) फोटो वापरल्याची परवा करत नाही. मात्र काही वेळा लोक अशा अकाउंटवरुन काही टिप्पणी करतात. लोकांना ते आम्हीच बोलत आहोत असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळेच हे पेज बंद करण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे, असे डोना यांनी सांगितले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sourav ganguly wife dona police complaint over fake facebook page