

South Africa and Zimbabwe T20 World Cup Squad
ESakal
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा एडेन मार्कराम कर्णधार असणार आहे. परंतु रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स या दोन फलंदाजांना वगळण्यात आले आहे. दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू न शकलेला कागिसो रबाडा विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात परतला आहे.