PAK vs SA : झुंजार पाकिस्तान! आफ्रिकेने सोपा विजय केला अवघड; अखेर महाराजनं पोहचवलं टॉपवर

PAK vs SA
PAK vs SAesakal

PAK vs SA World Cup 2023 Point Table : पाकिस्तानने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला चांगलाच घाम फोडला होता. फक्त 35 धावा करण्यासाठी आफ्रिकेने आपले चार फलंदाज खर्ची घालवले. अखेर केशव महाराजने शेवटची विकेट राहिली असताना चौकार मारत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. याचबरोबर पाकिस्तानवर लीग स्टेजमधूनच गाशा गुंडाळण्याची टांगती तलवार लटकली. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताचेही थोडे नुकसान झालं आहे. भारत आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

PAK vs SA
Shaheen Afridi : 4, 4, 4, 4, 2... डिकॉकनं फोडलं; मात्र शाहीननं बदला घेत शामीशी केली बरोबरी

पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या 271 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने आक्रमक सुरूवात केली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज सेट होऊन बाद झाले. पाकिस्तानने कोणत्याही जोडीला मोठी भागीदारी रचू दिली नाही. मात्र कर्णधार एडिन मारक्ररमने 91 धावांची झुंजार खेळी करत दक्षिण आफ्रिकेला 37 व्या षटकात 235 धावांपर्यंत पोहचवले होते.

मात्र विजयासाठी 35 धावा आणि हातात 5 विकेट्स असताना मार्को यान्सन 20 धावा करून बाज झाला. कर्णधार मारक्ररमने संघाला 250 टप्पा पार करून दिला. तो क्रीजवर होता त्यामुळे आफ्रिकेला विजयाची शाश्वती होती.

मात्र शादाब खानची कंकशन रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेल्या उसमा मीरने मारक्ररमची 91धावांवर विकेट घेतली. मीर हा यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिला कंकशन रिप्लेसमेंट खेळाडू ठरला.

PAK vs SA
IND vs ENG Playing 11 : लखनौची खेळपट्टी आहे तरी कशी ... प्लेईंग 11 निवडताना रोहितला द्यावा लागणार शामीचा बळी?

मारक्ररमचे शतकही हुकले आणि आफ्रिकेचा विजय देखील अडचणीत सापडला. कारण गेराल्ड कॉट्झी देखील आल्या पावली माघारी फिरला. त्यानंतर एन्गिडी आणि केशव महाराज यांनी सावध फलंदाजी करत 10 धावा जोडल्या. मात्र विजयासाठी 11 धावांची गरज असताना राऊफने एन्गिडीला बाद करून वातावरण टाईट केलं.

अखेर शम्सीवर अंपायर्सची कृपा झाली अन् त्याने देखील केशव महाराजला शेवटपर्यंत साथ दिली. महाराजने अखेर मीरला चौकार मारत आफ्रिकेचा फसलेला विजय साकार करून दिला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com