एका षटकात तब्बल आठ षटकारासह पन्नास धावा; ऑस्ट्रेलिया क्रिकेट क्लबमधील रेकॉर्ड

फलंदाज सॅम हॅरिसन याने नाथन बेनेट च्या षटकात हा विक्रम आपल्या नावावर केला.
नाथन बेनेट
नाथन बेनेटSAKAL

ऑस्ट्रेलिया : एका षटकात जास्तीत जास्त ३६ धावा काढल्या जाऊ शकतात हे आपल्याला माहीत असेल आणि हा विक्रम अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या नावावर देखील केला आहे. २००७ च्या T20 विश्वचषकाच्या दरम्यान इंग्लंडविरोधातील सामन्यात युवराज सिंगने ६ चेंडूत सहा षटकारासह ३६ धावा काढण्याचा विक्रम केला होता पण ६ चेंडूत तब्बल पन्नास धावा काढण्याचा विक्रम आपण पहिल्यांदाच ऐकला असेल. हा विक्रम एका ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूने केला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट क्लबच्या सोरेंटो डनक्रेग सीनियर क्लब आणि किंग्सले-वुडवाले सीनियर क्लब या दोन संघादरम्यान होत असलेल्या सामन्यात सोरेंटो डनक्रेग सीनियर क्लबकडून खेळणारा फलंदाज सॅम हॅरिसन याने नाथन बेनेट च्या षटकात हा विक्रम आपल्या नावावर केला.

नाथन ने आपल्या षटकात मध्ये दोन नो बॉल टाकल्यामुळे हे षटक ८ बॉलचे झाले. षटकातील प्रत्येक चेंडूवर हॅरिसनने षटकार ठोकले. हा विक्रम सामन्यातील ३९ व्या षटकात झाला. याबरोबर नाथन बेनेट हा एका षटकात ५० धावा देणारा गोलंदाज ठरला. फलंदाजाने याबरोबर सामन्यात ह्या एका षटकात अर्धशतक ठोकले आणि शेवटच्या म्हणजे ४० व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.

नाथन बेनेट
मॅच बघत बसू नको, सराव कर... पाहा धोनी-पंतचा 'हा' धमाल Video

सोरेंटो डनक्रेग सीनियर क्लबने ४० षटकात बनवल्या २७६ धावा

सोरेंटो डनक्रेग सीनियर क्लबने सुरुवातीला फलंदाजी करत ४० षटकात २७६ धावा काढल्या त्यात दोन फलंदाजाचे शतक असून यामध्ये सॅम हॅरिसनच्या शतकाचा सामावेश आहे.

याअगोदरही एका षटकात ७७ धावांचा विक्रम झाला आहे.

हा विक्रम पहिल्या वेळेसच नाहीतर याअगोदरही न्यूझीलंडमध्ये एका फर्स्ट क्लास सामन्यात बर्ट वेंस या गोलंदाजाने आश्चर्यजनक ७७ धावा दिल्या होत्या. हा आत्तापर्यंतचा सर्वांत जास्त धावा बनवण्याचा विक्रम होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com