Sri Lanka Defeat Afghanistan In T20 World Cup 2022
Sri Lanka Defeat Afghanistan In T20 World Cup 2022 esakal

AFG vs SL : लंकेने इंग्लंडचे टेन्शन वाढवले! अफगाणिस्तानचा केला 6 विकेट्सनी पराभव

Sri Lanka Defeat Afghanistan In T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप 1 च्या सामन्यात आज श्रीलकेने अफगाणिस्तानता 6 विकेट्स राखून पराभव केला. याचबरोबर श्रीलंका चार गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. यामुळे इंग्लंड एक स्थान घसरून चौथ्या स्थानावर पोहचली. आज इंग्लंड गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडशी भिडणार आहे. इंग्लंडसाठी आजच्या सामन्यात विजय महत्वाचा आहे.

श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान सामन्यात प्रथम फलंदाजी अफगाणिस्तानने 20 षटकात 8 बाद 144 धावा केल्या होत्या. हे आव्हान श्रीलंकेने 18.3 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. लंकेकडून धनंजया डि सेल्वाने 42 चेंडूत नाबाद 66 धावांची अर्शतकी खेळ केली. तर गोलंदाजीत वानुंदू हसरंगाने 13 धावात 3 बळी टिपले.

Sri Lanka Defeat Afghanistan In T20 World Cup 2022
Rohit Sharma : कर्णधारही हतबल; रोहितच्या खास दोस्ताला कसोटी संघातून कायमचा डच्चू?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला चांगल्या सुरूवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. गुरबाझ आणि उस्मान घानी या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तानला 42 धावांपर्यंत पोहचवले होते. मात्र पॉवर प्ले संपल्या संपल्या श्रीलंकेने अफगाणिस्तानला धक्के देण्यास सुरूवात केली. लाहिरू कुमाराने गुरबाझला 28 धावांवर तर वानिंदू हसरंगाने घानीला 27 धावांवर बाद करत सलामी जोडी माघारी धाडली.

यानंतर अफगाणिस्तानच्या इब्राहीम झादरानने 22 तर नजिबुल्लाने 18 धावांची खेळी करत संघाला शतक पार करून दिले. मात्र संथ फलंदाजी करणाऱ्या या दोघांनीही धावगती वाढवत मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यानंतर गुलबदीन 12 तर नबी 13 धावांची भर घालून माघारी परतला. दरम्यान, वानिंदू हसरंगाने राशिद खानला 9 तर मुजीबला 1 धावेवर बाद करत अफगाणिस्तानच्या शेपटला जास्त वळवळ करू दिली नाही. अखेर अफगाणिस्तानचा डाव 20 षटकात 8 बाद 144 धावांवर संपुष्टात आला.

Sri Lanka Defeat Afghanistan In T20 World Cup 2022
Wasim Jaffer : निवड समितीच्या धडाकेबाज निर्णयांवर वसीम जाफरला आली ‘चक्कर’

अफगाणिस्तानचे विजयाचे 145 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. सलामीवीर पथुम निसंका 10 तर कुसल मेंडीस 27 चेंडूत 25 धावा करून माघारी परतले. आठव्या षटकात 2 बाद 46 धावा अशी अवस्था झालेल्या श्रीलंकेला धनंजया डि सेल्वा चरीथ असलंका यांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत शतकी मजल मारून दिला. संघाच्या 100 धावा झाल्या असताना असलंका 19 धावांवर बाद झाला.

त्यानंतर धनंजयाने अर्धशतकी खेळी डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने भानुका राजापक्षेसोबत चौथ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी रचत संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. मात्र विजय अवघा तीन धावा दूर असताना राजापक्षे 14 चेंडूत 18 धावा करून माघारी परतला. अखेर धनंजया डि सेल्वाने 19 व्या षटकात श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com