esakal | IND vs SL: प्रेमदासा स्टेडियमवर रात्री सूर्या चमकला; पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav

IND vs SL: प्रेमदासा स्टेडियमवर रात्री सूर्या चमकला; पण...

sakal_logo
By
सुशांत जाधव

Suryakumar Yadav First ODI Fifty: श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली. सलामीवीर पृथ्वी शॉ, स्वस्तात माघारी परतल्यानंतर ईशान किशन, मनिष पांडे आणि धवनही नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरले. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर सूर्यकुमार यादवने आश्वासक खेळी केली. त्याने 43 व्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचत सूर्याने वनडे कारकिर्दीतील पहिले वहिले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर त्याची खेळी आणखी बहरेल, असे वाटत होते. पण तो 53 धावा करुन माघारी फिरला. त्याने केलेली खेळी भारताकडून सर्वोच्च ठरली. (Sri Lanka vs India 2nd ODI Maiden ODI fifty for Suryakumar Yadav )

हेही वाचा: SL vs IND : भुवीनं 6 वर्षानंतर टाकला नो बॉल!

श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 50 षटकात 9 बाद 275 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ 13, कर्णधार शिखर धवन 29 आणि पदार्पणात अर्धशतकी खेळी करणारा ईशान किशन अवघी एक धाव करुन माघारी फिरला. त्यानंतर मनीष पांडेच्या साथीने सूर्यकुमार यादवने भारतीय संघाचा डाव सावरला. दुसऱ्या वनडेत सूर्याने संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित करणारी खेळी केली. तो मोठी खेळी करुन टीम इंडियाला विजय मिळवूनच परतेल, असे वाटत होते. पण 27 व्या षटकात संदाकन याने त्याला पायिचित केले.

हेही वाचा: ENG vs IND : कसोटी मालिकेपूर्वी विराट-अजिंक्य दुखापतग्रस्त

भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या सामन्यात 263 धावांचे आव्हान भारतीय संघाने 7 गडी राखून पार केले होते. यावेळी पृथ्वी शॉने 43, शिखर धवन (86), ईशान किशन (59) धावा केल्या होत्या. या सामन्यातही सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने 31 धावांचे योगदान दिले होते.

loading image