SLW vs INDW : तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत लंकेने व्हाईट वॉश वाचवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Women Cricket Team Defeat India In 3rd T20I but India Won Series By 2-1

SLW vs INDW : तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत लंकेने व्हाईट वॉश वाचवला

दांबुला : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात लंकेने भारताचा 7 फलंदाज राखून पराभव केला. जरी भारताने सामना हरला असला तरी मालिका 2 - 1 खिशात टाकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रीलंकेसमोर 138 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान लंकेने 17 षटकात 3 बाद 141 धावा करून सहज पार केले. श्रीलंकेकडून चामरी आटापटूने नाबाद 80 धावांची खेळी केली. तर भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 39 धावा केल्या. (Sri Lanka Women Cricket Team Defeat India In 3rd T20I but India Won Series By 2-1)

हेही वाचा: 'फलंदाज' साऊदीची कसोटीत कमाल; सचिन, पॉटिंग अन् डिव्हिलियर्सच्याही गेला पुढे

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने खारब सुरूवातीनंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर स्मृती मानधना आणि साभिनेनी मेघना यांनी प्रत्येकी 22 धावांची खेळी करत भागीदारी उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र रणशिंगे आणि रणवीरा यांनी या दोघांनी बाद करत हा मनसुबा उधळून लावला. त्यानंतर आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जने डाव सावरत संघाला शतकी मजल मारून दिली. मात्र रॉड्रिग्ज 33 धावांची खेळी करून 19 व्या षटकात बाद झाली. अखेर हरमनप्रीतने नाबाद 39 धावांची खेळी करत संघाला 138 धावांपर्यंत पोहचवले. तिला पूजा वस्त्राकरने 6 चेंडूत 13 धावांची खेळी करून चांगली साथ दिली.

हेही वाचा: रोहितच्या टी 20 कॅप्टन्सीबाबत विरेंद्र सेहवागचं मोठं वक्तव्यं

भारताचे 139 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात देखील खराब झाली. रेणुका सिंहने विशमी गुणरत्नेला 5 धावांवर बाद केले. तर संघाच्या 37 धावा झाल्या असताना हर्षिता मडवीला राधा यादवने 13 धावांवर बाद केले. यानंतर मात्र सलामीवीर चामरी आटापटू आणि निलाक्षी डे सिल्वा यांनी लंकेला शतकी मजल मारून दिली. दरम्यान, आटापटूने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले होते. मात्र संघाची धावसंख्या 114 धावांपर्यंत पोहचली असताना निलाक्षी 30 धावा करून धावबाद झाली. यानंतर आटापटूने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत नाबाद 80 धावांची खेळी करत श्रीलंकेला 17 व्या षटकातच विजय मिळवून दिला.

तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन टी 20 सामने यापूर्वीच भारताने जिंकले असल्याने भारताने ही टी 20 मालिका 2 - 1 अशी जिंकली. आता 1 जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 1 जुलै, दुसरा सामना 4 जुलै आणि तिसरा सामना 7 जुलैला होणार आहे.

Web Title: Sri Lanka Women Cricket Team Defeat India In 3rd T20i But India Won Series By 2 1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..