17 वर्षांच्या पठ्ठ्यानं टाकलं अख्तरला मागे; 175च्या स्पीडनं करतो बॉलिंग!

वृत्तसंस्था
Tuesday, 21 January 2020

2003च्या विश्वकरंडकात इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात 161.3 किमी ताशी वेगाने चेंडू टाकला होता. 

ब्लोमफॉन्टेन (दक्षिण आफ्रिका) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडकात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात एका विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या माथिशा पाथिराना या 17 वर्षांच्या गोलंदाजाने 175 किमी ताशी वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम रचला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताची फलंदाजी सुरु असताना चौथ्या षटकात माथिशाने यशस्वी जैस्वालला एक वाईड चेंडू टाकला. त्याचा ताशी वेग 175 किमी नोंदविला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांत वेगवान चेंडू म्हणून या चेंडूची नोंद झाली आहे.

- INDvsNZ : शिखर धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; हे तीन पर्याय

'रावळपिंडी एक्सप्रेस' अख्तरचा विक्रम मोडला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी सर्वांत वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज 'रावळपिंडी एक्सप्रेस' शोएब अख्तरच्या नावावर होता. त्याने 2003च्या विश्वकरंडकात इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात 161.3 किमी ताशी वेगाने चेंडू टाकला होता. 

- ICC ODI Rankings : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंचा दबदबा कायम; जडेजाची एन्ट्री!

सर्वांत वेगवान चेंडू

शोएब अख्तर (पाकिस्तान) - ताशी 161.3 किमी
शॉन टेट (ऑस्ट्रेलिया) - ताशी 161.1 किमी
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) - ताशी 161.1 किमी

- धोनीबाबत आता चेन्नई सुपर किंग्जनेही घेतला मोठा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sri Lankan bowler Matheesha Pathirana bowls 175 kph in U19 world cup against India