esakal | ICC ODI Rankings : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंचा दबदबा कायम; जडेजाची एन्ट्री!
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

भारताची 'रणमशिन' म्हणून ओळखला जाणारा किंग कोहली अव्वलस्थानी, तर हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. 

ICC ODI Rankings : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंचा दबदबा कायम; जडेजाची एन्ट्री!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी (ता.19) झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची जागतिक क्रमवारी जाहीर केली. यामध्ये फलंदाजांच्या यादीत भारताची 'रणमशिन' म्हणून ओळखला जाणारा किंग कोहली अव्वलस्थानी, तर हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. 

- धोनीबाबत आता चेन्नई सुपर किंग्जनेही घेतला मोठा निर्णय

विराटच्या खात्यात 886 गुण आहेत, तर रोहितच्या खात्यात 868 गुण जमा झाले आहेत. रोहितचे सलामीवीर जोडीदार अशी भूमिका निभावणाऱ्या शिखर धवन आणि के.एल.राहुल यांनी लक्ष्यवेधी कामगिरी करत सर्वांचे लक्ष्य वेधले. धवन 7 स्थानांनी आगेकूच करत 15 व्या स्थानी आला आहे, तर राहुलने 21 स्थानांची हनुमान उडी घेत 50 वे स्थान पटकाविले आहे.

- INDvsAUS : शतक हुकलं तरी कोहलीचं ठरलाय 'किंग'!

गोलंदाजांच्या यादीत भारताच्या जसप्रित बुमराने 764 गुणांसह आपले सिंहासन कायम राखले आहे. त्याच्यानंतर फिरकीपटू रविंद्र जडेजा 2 स्थानांची झेप घेत 27 व्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (737 गुण) आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रेहमान (701 गुण) हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी विराजमान झाले आहेत. 

- INDvsAUS : 'शर्माजी का बेटा छा गया'; रोहितने शतकी खेळीत केले 5 विक्रम!

आयसीसीने जाहीर केलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताच्या रविंद्र जडेजाने टॉप-टेनमध्ये स्थान मिळविले आहे. जडेजा या यादीत 10 व्या स्थानी असून त्याच्याव्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूला या यादीत स्थान मिळालेले नाही.

loading image