Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

Neeraj Chopra Silver Medal Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या भालाफेक अंतिम फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागेने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आणि राष्ट्रकुल स्पर्धेला नवा भालाफेक चॅम्पियन मिळवून दिला.
Rumesh Tharanga Pathirage

Rumesh Tharanga Pathirage

esakal

Updated on

Rumesh Pathirage wins Men's Javelin Throw Final CWG 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भालाफेक फायनलमध्ये श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागेने अपेक्षित कामगिरी केली. नीरज चोप्रा ( Neeraj Chopra Silver Medal) व अर्शद नदीम या ऑलिम्पिक व राष्ट्रकुल पदक विजेत्यांना त्याने सुवर्णपदकापासून दूर ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गतविजेता अर्शद तिसऱ्या प्रयत्नानंतर स्पर्धेबाहेर फेकला गेला... पथिरागेने सुवर्णपदक निश्चित करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत नवा चॅम्पियन दिला, तर २०१८ च्या विजेत्या नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण, भारताच्या यशवीर सिंग ( YASH VIR SINGH WIN BRONZE) त्याच्या शेवटच्या प्रयत्नात आश्चर्यकारक कामगिरी करून कांस्यपदक जिंकले. भारताच्या दोन खेळाडूंनी पदकांची कमाई करण्याची ही पहिलीच वेळ ठऱली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com