esakal | IPL 2021: ठरलं! स्टार स्पोर्ट्सने जाहीर केलं कॉमेंट्री पॅनेल
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-G-Tanya-Purohit

IPL 2021: ठरलं! स्टार स्पोर्ट्सने जाहीर केलं कॉमेंट्री पॅनेल

sakal_logo
By
विराज भागवत

१९ सप्टेंबरपासून IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

IPL 2021: भारतीय संघाची इंग्लंडविरूद्धची शेवटची कसोटी पुढे ढकलण्यात आली. मुख्य कोच रवी शास्त्री आणि ज्युनियर फिजीओ योगेश परमार या दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खेळाडूंनी सामना खेळायला नकार दिला. त्यानंतर आता जवळपास सर्व खेळाडू IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यासाठी युएईमध्ये दाखल झाले आहे. IPL मध्ये खेळाडूंइतकीच उत्सुकता असते ती कॉमेंट्री पॅनेलची... IPL च्या प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार स्पोर्ट्सने स्टार समालोचकांचे पॅनेल जाहीर केले.

हेही वाचा: IPL 2021: धोनीने हात दाखवताच चिमुरड्याने काय केलं पाहा (Video)

यंदा IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यासाठी इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, किरण मोरे, निखिल चोप्रा, तानया पुरोहित, आकाश चोप्रा, जतिन सप्रू, सुरेन सुंदरम हे हिंदी समालोचक म्हणून काम पाहणार आहेत. तर, हर्षा भोगले, सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, दीप दासगुप्ता, अंजुम चोप्रा, इयन बिशप, अँलन विल्कीन्स, पॉमी बांग्वा, निकोलस नाईट, डॅनी मॉरिसन, सायमन डुल, मॅथ्यू हेडन आणि केविन पीटरसन हे कॉमेंटेटर असणार आहेत.

हेही वाचा: IPL 2021 : प्रितीच्या पंजाबची झटपट अ‍ॅक्शन; मलानची जागा भरली

दरम्यान, आयपीएल स्पर्धेला प्राधान्य देत भारतीय संघाने अखेरची कसोटी खेळणं टाळल्याची चर्चा ब्रिटन प्रसारमाध्यमांनी केला. त्यामुळे, इंग्लंडचे खेळाडू IPL स्पर्धेत खेळणार की नाहीत, अशीही चर्चा आहे. असे असताना ही चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. IPL खेळणाऱ्या इंग्लंडच्या तिघांनी माघार घेतली आहे. सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो, पंजाब किंग्जच्या ताफ्यातील डेविड मलान आणि दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळणारा ख्रिस वोक्स यांनी वैयक्तिक कारण देत स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे.

loading image
go to top