Steve Smith IND vs AUS : स्टीव्ह स्मिथने वनडेमध्ये केला मोठा धमाका, तेंडुलकरलाही टाकले मागे

New Record: वनडे क्रिकेटमध्ये वेगाने 5000 धावा करणाऱ्यांच्या यादीत.
Steve Smith IND vs AUS
Steve Smith IND vs AUSesakal

Steve Smith IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारूंकडून डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केलं. स्टीव्ह स्मिथने 74 धावा केल्या. याचबरोबर एक मोठा माईल स्टोन देखील पार केला.

Steve Smith IND vs AUS
IND vs AUS 3rd ODI LIVE : बुमराह अखेर चमकला; कांगारूंचा निम्मा संघ गारद मात्र गाठला 300 चा आकडा

स्मिथने वनडे क्रिकेटमध्ये 5000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 5000 धावा करणाऱ्यांच्या यादीत स्टीव्ह स्मिथने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकले. सचिनने 138 वनडे डावात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथने 129 वनडे डावात 5000 धावा पूर्ण केल्या आहेत.

स्मिथने सचिन तेंडुलकर सोबतच ग्रॅम स्मिथ (131 डाव), मार्टिन गप्टिल (132), पॉल स्टर्लिंग (132), मॅथ्यू हेडन (133), मायकल बेवन (135), एमएस धोनी (135), गौतम गंभीर (135), गॅरी कर्स्टन (137), रिकी पाँटिंग (137), जॅक कॅलिक (137), ख्रिस गेल (137) यांना देखील मागे टाकले.

Steve Smith IND vs AUS
Babar Azam PCB : अखेर बाबर सेनेपुढे पीसीबी झुकलं; मात्र उत्पन्नात मिळाला अल्प वाटा

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 5000 धावा करण्याचा विक्रम हा पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 97 डावात 5000 धावा केल्या होत्या. हाशिम आमलाने 101 डावात वनडेमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. तर व्हिव रिचर्ड्स यांनी 114 तर विराट कोहलीने 115 डावात ही कामगिरी केली आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com