Steve Smith : वॉर्नर निवृत्त होताच स्टीव्ह स्मिथवर येणार मोठी जबाबदारी; आता कसोटीत...

Steve Smith
Steve Smithesakal

Steve Smith Return As Opener In Test Cricket : ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नुकतेच कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कोण हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, वॉर्नरची जागा स्टीव्ह स्मिथ घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वेस्ट इंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा होणार असून कॅमेरून ग्रीनची देखील संघात निवड होण्याची शक्यता आहे.

Steve Smith
Cape Town Pitch : असमाधानकारक! केप टाऊनच्या खेळपट्टीवर अखेर आयसीसीने ओढले ताशेरे

स्टीव्ह स्मिथला डेव्हिड वॉर्नरची रिप्लेसमेंट म्हणून घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे. स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येण्याची शक्यता आहे. याचबरोबर कॅमरून ग्रीनची देखील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता. सिडनीत पाकिस्तानविरूद्धचा खेळलेला कसोटी सामना हा डेव्हिड वॉर्नरचा कसोटी क्रिकेटमधील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

ऑस्ट्रेलियाचा संघ बुधवारी घोषित होण्याची शक्यता आहे. या संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण डेव्हिड वर्नर निवृत्त झाल्यानंतर कसोटी संघात त्याची जागा कोण घेणार याबाबत उत्सुकता आहे. सध्या रेसमध्ये कॅमेरून बेनक्रॉफ्ट, मार्कस हॅरिस, मॅथ्यू रेनशॉ यांची नावं चर्चेत आहेत. मात्र स्टीव्ह स्मिथ आयत्यावेळी सलामीवीर म्हणून परतणार असल्याचं बोललं जात आहे. त्याने देखील सलामीवीर म्हणून कसोटीत खेळण्यास उत्सुकता दाखवली आहे.

Steve Smith
BCCI Sponsorship : रिलायन्सच्या Campa ने जिंकली बीसीसीआयची स्पॉन्सरशिप; कोका-कोला, पेप्सिकोची मक्तेदारी संपणार?

मिचेल मार्शने 2023 च्या अॅशेस मालिकेत ग्रीनचा पत्ता कट करत संघातील आपले स्थान बळटक केलं होतं. तो देखील आता संघात स्थान पटकावण्यासाठी उत्सुक आहे. स्मिथ हा उस्मान ख्वाजाच्या सोबतीला सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी तयार आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com