Sunil Gavaskar VIDEO : तुझं सॉरी मला मान्य नाही... समालोचन करताना गावसकर पठाणला असं का म्हणाले?

Sunil Gavaskar Irfan Pathan
Sunil Gavaskar Irfan Pathan esakal

Sunil Gavaskar Irfan Pathan : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला. रोहित सेनेचा सेंचुरियनवर एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची विजयी होण्याची आशा संपुष्टात आली आहे. जर भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला तरी मालिका बरोबरीत येणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजी दोन्ही डावात कोसळली. केएल राहुल आणि विराट कोहलीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना फारशी झुंज देता आली नाही. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर आणि वेगवान गोलंदाज इरफान पाठण यांनी समालोचन करताना भारतीय फलंदाजांच्या तंत्राचं विश्लेषण केलं.

त्यावेळी इरफानने सुनिल गावसकरांची माफी मागितली होती. मात्र या माफीनाम्याचा सुनिल गावसकर यांनी स्विकार केला नाही.

Sunil Gavaskar Irfan Pathan
Sri Lanka Cricket News | नव्या वर्षात संघाला मिळाला नवा कर्णधार, 'या' खेळाडूच्या हाती दिली धूरा

इरफान पठाणने केएल राहुल दक्षिण आफ्रिकेत इतका यशस्वी का ठरतोय याचं विश्लेषण केलं. त्याने चेंडू खेळताना केएल राहुलच्या बॅटचा कोण कसा असतो हे सांगत आपल्या उत्तम निरीक्षण कौशल्याची प्रचिती दिली. दरम्यान, इरफानने सुनिल गावसकरांसमोर लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणून क्षमा मागितली.

मात्र सुनिल गावसकरांनी इरफान पठाणचे क्षमा मागणे मान्य केली नाही. त्यांनी विश्लेषण करताना अत्यंत बारीक गोष्ट आणि एक वेगळा दृष्टीकोण समोर ठेवण्यासाठी इरफान पाठाणची पाठ थोपटली.

Sunil Gavaskar Irfan Pathan
Mohammad Rizwan : पाकचं तंत्रज्ञानाचं रडगाणं... रिझवान प्रकरणी PCB करणार ICC कडे तक्रार

सुनिल गावसकर म्हणाले, 'यांनी मला सॉरी म्हटलं मात्र मी ते स्विकारणार नाही.' गावसकरांनी सांगितलं की मी या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता. आज इरफानमुळे मला बॅटचा कोण कसा असलायला हवा हे शिकता आलं. ज्यावेळी तुम्ही खेळाचे कायम विद्यार्थी राहता त्यावेळी अशा प्रकारे तुम्ही विश्लेषण करू शकता.'

गावसकरांनी पाठ थोपटली त्यावेळी इरफानने आपल्या ह्रदयावर हात ठेवून गावसकरांचे कौतुकाचे बोल बोलल्याबद्दल आभार मानले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com