Wrestler Protest Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने कुस्तीपटूंची याचिका केली बंद, सरन्यायाधीश म्हणाले...

Wrestler Protest Supreme Court
Wrestler Protest Supreme Court esakal

Wrestler Protest Supreme Court : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू जंतर - मंतरवर आंदोलन करत आहेत. याचदरम्यान, त्यांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध दिल्ली पोलीस एफआयआर दाखल करण्यासा टाळाटाळ करत असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने बंद केली आहे.

Wrestler Protest Supreme Court
Gautam Gambhir IPL 2023 : कोहली - कोहली काही गंभीरची पाठ सोडेना, संबंध नसतानाही विराट चाहत्यांना डिवचले

याबाबत बोलताना सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी सांगितले की, याचिका एफआयआर दाखल व्हावी म्हणून करण्यात आली होती. आता एफआयआर दाखल झाली आहे. आता न्यायासठी कुस्तीपटूंना खालच्या न्यायालयांचा पर्याय खुला आहे.

बृजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करत सात महिला कुस्तीपटूंनी सीलबंद प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिलला बृजभूषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली होती.

ही याचिका गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पीडित कुस्तीपटूंच्या वकिलांनी बुधवारीच सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्राच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला होता.

Wrestler Protest Supreme Court
Virat Kohli IPL 2023 : 'हा' क्रिकेटचा खरा बॉस! गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीने शेअर केला तो व्हिडिओ

पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट

आंदोलनकर्ते कुस्तीपटू आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये 3 मे च्या मध्य रात्री झटापट झाली. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंना फोल्डिंग बेड आणण्यास मज्जाव केला. प्रदर्शनकर्त्या कुस्तीपटूंनी दावा केला की पोलीस नशेत होते. त्यांनी प्रदर्शनात सामील असलेल्या कुस्तीपटूंवर हल्ला चढवला. त्यांच्यासोबत असलेल्या पोलीसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न देखील केला नाही.

घटनास्थळी उपस्थित असलेली विनेश फोगाट रडू लागली. तिने या परिस्थितीवर निराशा व्यक्त केली. कुस्तीत भारतासाठी अनेक पदके जिंकलेल्या विनेशने पोलीसांनी सर्वांना धक्के मारल्याचा आरोप केला. यावेळी घटनास्थळी महिला पोलीस कर्मचारी देखील उपस्थित नव्हत्या. यावर विनेशने चिंता व्यक्त केली.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com