Ganesh Chaturthi 2023 : सूर्यकुमार, तिलक लालबागचा राजाच्या चरणी लीन, Video पाहून चाहते म्हणतात...

Lalgaugcha Raja Suryakumar Yadav Tilak Varma
Lalgaugcha Raja Suryakumar Yadav Tilak Varma esakal

Lalgaugcha Raja Suryakumar Yadav Tilak Varma : भारतीय संघातील स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ लालबागचा राजाला भेट दिली. यावेळी सूर्यकुमार आणि तिलक वर्मा लालबागच्या राजाच्या चरणी लीन होताना दिसले.

अनेक सेलिब्रेटींप्रमाणे भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूंनी देखील यंदाचा गणेश उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला. काही सेलिब्रेटी क्रिकेटपटूंनी लालबागच्या राजाचं दर्शन देखील घेतलं.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

Lalgaugcha Raja Suryakumar Yadav Tilak Varma
Ganesh Chaturthi 2023 : रोहित-विराटसह 'या' खेळाडूंच्या घरी बाप्पाचे आगमन, फोटो अन् व्हिडिओ व्हायरल… पाहा झलक

भारतीय संघातील 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव आणि नुकतेच भारताकडून टी 20 आणि वनडे पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माने लालबागच्या राजच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मात्र हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी खोचक प्रतिक्रिया देखील दिली. सकाळच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सूर्यकुमार आणि तिलक वर्माच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Lalgaugcha Raja Suryakumar Yadav Tilak Varma
Cristiano Ronaldo In WWE : ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलच्या मैदानातून थेट WWE च्या आखाड्यात; सौदीत होणार मोठा इव्हेंट

या व्हिडिओवर jay_p_bornforjustice या नेटकऱ्याने खोचक प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो की, 'त्यांना निवांत पाया पडू देत आणि जे पाच - पाच, दहा - दहा तास रांगेत उभी राहून दर्शन घेत आहेत त्यांना धक्के मारून बाहेर काढा.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com