Suryakumar KL Rahul ICC T20I Rankings | सूर्यकुमारची २४ स्थानांची 'गरूडझेप'; दमदार कामगिरीचं मिळालं फळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar-Yadav

लोकेश राहुलचाही झाला फायदा, वाचा सविस्तर

सूर्यकुमारची २४ स्थानांची 'गरूडझेप'; दमदार कामगिरीचं मिळालं फळ

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs NZ : भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्धच्या टी२० मालिकेत ३-० असं निर्भेळ यश मिळवलं. पूर्णवेळ टी२० कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच मालिका होती. या मालिकेमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांसारख्या बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव या तीन फलंदाजांनी संघाला खूप चांगल्या पद्धतीने सुरूवात मिळवून दिली. सूर्यकुमार यादवला दमदार कामगिरीच्या जोरावर मोठं फळ मिळालं.

हेही वाचा: IND vs NZ: सूर्यकुमार की श्रेयस.. चौथ्या नंबरवर कोणाला बॅटिंग?

सूर्यकुमार यादवने तीन सामन्यांच्या मालिकेत एका सामन्यात मालिकावीराचा किताब मिळवला. ६२ धावांची खेळी करत त्याने संघाला दमदार विजय मिळवून दिला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव २४ स्थानांची गरूडझेप घेऊन ५९व्या स्थानी पोहोचला. लोकेश राहुलनेही दमदार कामगिरी करत मालिकेत ८० धावा केल्या. त्यामुळे त्याला ४ स्थानांची बढती मिळाली. फलंदाजांच्या 'टॉप टेन'च्या यादीत लोकेश राहुल हा एकमेव भारतीय आहे. तो 729 गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा: IND vs NZ : द्रविड गुरूजींनी स्वत:च केली बॉलिंग, पाहा Video

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत रोहित शर्माने आपल्या स्थानात सुधारणा केली. तर दुसरीकडे विश्रांतीवर असलेल्या विराट कोहलीच्या स्थानात घसरण झाली. तो 'टॉप टेन'मधून बाहेर गेलाय. रोहित शर्माने १५व्या स्थानावर १३व्या स्थानावर झेप घेतली.

loading image
go to top