T20WC : उपांत्य फेरीसाठी आज रस्सीखेच; इंग्लंडचा-न्यूझीलंडशी तर अफगाणचा-श्रीलंकाशी सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup 2022

T20WC : उपांत्य फेरीसाठी आज रस्सीखेच; इंग्लंडचा-न्यूझीलंडशी तर अफगाणचा-श्रीलंकाशी सामना

T20 World Cup 2022 : टी-20 विश्‍वकरंडकातील गट एक मध्ये उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी कमालीची रस्सीखेच दिसून येत आहे. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी प्रत्येकी 5 गुण मिळवले असून इंग्लंड व आयर्लंडने यांनी प्रत्येकी 3 गुणांची कमाई केली आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिस्बेनमध्ये आज होणार असलेल्या न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यामधील लढतींकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

हेही वाचा: T20WC : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडची गोची, आयर्लंडला हरवून पॉइंट टेबलमध्ये...

केन विल्यमसनच्या नेतृत्वात मैदानात उतरणारा न्यूझीलंडचा संघ यंदाच्या स्पर्धेमध्ये छान खेळ करीत आहे. सलामीच्या लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर त्यांची अफगाणिस्तानविरुद्धची लढत रद्द झाली. त्यानंतर श्रीलंकेला पराभूत करण्यात त्यांना यश लाभले. आता उद्या त्यांनी इंग्लंडवर विजय मिळवल्यास उपांत्य फेरीत पोहोचणारा न्यूझीलंडचा पहिलाच संघ असेल. ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर हे गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत आहेत. डेव्होन कॉनवे, ग्लेन फिलीप्स यांनी आतापर्यत ठसा उमटवला आहे, पण केन विल्यमसन, फिन ॲलेन, डॅरील मिचेल यांच्या फलंदाजीत सातत्य असायला हवे.

हेही वाचा: Shoaib Akhtar : पराभव भारताचा शोककळा पाकिस्तानात; अख्तर म्हणाला, "भारताने.."

अफगाण-श्रीलंका सामना

गट एकमधील आणखी एक लढत आज ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यामध्ये ही लढत पार पडेल. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त २ गुणांचीच कमाई केली आहे. जर तरच्या समीकरणावर या संघाचे पुढील गणित अवलंबून असणार आहे.

आजच्या लढती

  • अफगाणिस्तान-श्रीलंका - ब्रिस्बेन, सकाळी 9.30 वाजता

  • इंग्लंड - न्यूझीलंड - ब्रिस्बेन, दुपारी 1.30 वाजता