Matthew Wade : यजमान Corona च्या विळख्यात? ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Matthew Wade Corona Positive T20 World Cup 2022

Matthew Wade : यजमान Corona च्या विळख्यात? ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू पॉझिटिव्ह

Matthew Wade Corona Positive T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 ची यजमान ऑस्ट्रेलिया कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे की काय अशी भीती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरूद्धच्या सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे. त्यांचा आक्रमक फलंदाज आणि एकमेव विकेटकिपर मॅथ्यू वेडला कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झाम्पा देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने गेल्या सामन्याला मुकला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाची चांगलीच अडचण झाली आहे. कारण ऑस्ट्रेलियाकडे बॅक अप विकेटकिपर नाहीये.

हेही वाचा: BCCI: जय शाह यांची ऐतिहासिक घोषणा, आता महिलांना देखील मिळणार समान मानधन

ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कोरोनाचा पहिल्यांदा फटका बसला. त्यांचा आघाडीची फिरकीपटू अॅडम झाम्पाला कोरोनाची लागण झाल्याने तो सामन्याला मुकला. मात्र कांगारूंकडे त्याचा बॅक अप असल्याने तितकीशी अडचण आली नाही. झाम्पाच्या जागी अॅश्टोन अॅगर संघात आला. मात्र मॅथ्यू वेडलाच कोरोनाची लागण झाल्याने ऑस्ट्रेलियासाठी मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

कारण ऑस्ट्रेलियाकडे बॅक अप विकेटकिपर नाहीये. ऑस्ट्रेलियाचा बॅक अप विकेटकिपर जॉश इंग्लिस दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी दुसरा विकेटकिपर न घेता अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला संघात घेण्याची जोखीम कांगारूंनी घेतली होती. आता हीच जोखीम अंगलट येण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs NED : योगायोग! आधी वडील भिडले, आता मुलगा भारताविरूद्ध थोपटणार दंड

आयर्लंडने इंग्लंडला मात दिल्यामुळे सुपर 12 च्या ग्रुप 1 मध्ये सगळी उलथापालथ झाली आहे. त्यात उद्या (दि. 28) होत असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या महत्वाच्या सामन्यात स्पेशलिस्ट विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज संघात नसणे ऑस्ट्रेलियासाठी चांगली गोष्ट नाही.

मात्र जरी मॅथ्यू वेडला कोरोना झाली असला तरी जर तो सामना खेळण्यास फिट असेल तर ऑस्ट्रेलिया त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देऊ शकतो. कारण आयसीसीने कोरोनाग्रस्त खेळाडूला देखील सामना खेळण्याची मुभा दिली आहे.