IND vs ENG : भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसाने वाहून गेली तर... नियम काय सांगतो भाऊ?

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस झाला नाही तर... कसा लागेल निकाल
IND vs ENG
IND vs ENG

IND vs ENG T20 World Cup : अॅडलेडच्या मैदानावर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात मोठी लढत रंगणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ प्रत्येकी दोन हात करताना दिसणार आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. पावसामुळे जर खेळ खराब झाला तर... अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चा नियम काय सांगतो.

IND vs ENG
Sania-Shoaib : 12 वर्षांचा संसार मोडला? सानिया-शोएबचा घटस्फोट फायनल, मित्राने केला मोठा खुलासा

टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण सात सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला आहे. आता भारत-इंग्लंड उपांत्य फेरी आणि फायनलमध्ये पावसाचा अडथळा येईल अशी भीती चाहत्यांना वाटत आहे. उरलेल्या दोन सामन्यांमध्ये पाऊस पडला तर? वास्तविक आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पहिल्या दिवशी सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी तिथून सामना सुरू होणार आहे .

IND vs ENG
IND vs END: ॲडलेडमध्ये काही तासात बदलले हवामान! उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस ?

दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्ण झाला नाही, तर सुपर-12 मधील अव्वल संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. याचा अर्थ भारतीय संघ सेमी फायनल मध्ये जाईल. भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत भिडतील. भारत गट-2 मध्ये आठ गुणांसह अव्वल स्थानावर होता. नियमानुसार पावसानंतर किमान पाच-पाच षटके सामन्याचा निकाल आवश्यक आहे. नॉकआऊट सामन्यांमध्ये ती 10-10 षटकांपर्यंत कमी करण्यात आली आहे. पावसामुळे सामन्याचा निर्णय झाला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकही संयुक्त विजेता झालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com