झिम्बाब्वे T20 World Cup 2022 साठी पात्र, जाणून घ्या कोणते 16 संघ खेळणार

उपांत्य फेरीत यूएस आणि पापुआ न्यू गिनी यांना पराभूत करून ICC T20 World Cup 2022 मध्ये आपली जागा केली निश्चित
T20 World Cup 2022
T20 World Cup 2022sakal

T20 World Cup 2022 : नेदरलँड आणि झिम्बाब्वे यांनी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक पात्रता बी च्या उपांत्य फेरीत यूएस आणि पापुआ न्यू गिनी यांना पराभूत करून ICC T20 World Cup 2022 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. नेदरलँड्सने उपांत्य फेरीत अमेरिकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला. त्याने अमेरिकेला 19.4 षटकांत 138 धावांत गुंडाळले. झिम्बाब्वेने पापुआ न्यू गिनीचा 27 धावांनी पराभव केला.

झिम्बाब्वेने पापुआ न्यू गिनीचा 27 धावांनी पराभव केला. स्पर्धेतील यजमान झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फायदेशीर ठरला. रेगिस चकाबवा आणि कर्णधार क्रेग आयर्विन या अनुभवी जोडीने चांगली सुरुवात केली. विकेट्स पडल्यानेही झिम्बाब्वेचा धावांचा वेग थांबला नाही. इर्विन आणि वेस्ली माधवरे यांनी वारंवार अंतराने चौकार मारले. मधल्या फळीने उपयुक्त धावा केल्याने संघाला 20 षटकांत 5 बाद 199 अशी भक्कम धावसंख्या उभारण्यास मदत झाली. दुसरीकडे पापुआ न्यू गिनी 20 षटकांत संघाला आठ विकेट्सवर केवळ 172 धावा करता आल्या.

हे दोन संघ पात्र ठरल्यानंतर आता स्पर्धेत 16 संघ पूर्ण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला आहे, तर उर्वरित 11 संघांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.

याशिवाय ग्लोबल क्वालिफायर A मधून आयर्लंड आणि अमेरिका तर क्वालिफायर B मधून नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे 2022 च्या ICC पुरुष T20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com