KL Rahul: अथिया शेट्टीचा पायगुण; फ्लॉप KL राहुल ठरला मॅच विनर

KL Rahul
KL Rahulesakal

टी-20 विश्वचषक 2022 च्या महत्त्वाच्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. मात्र, क्रिकेट जगतात या विजयासोबत चर्चा सुरू आहे. ती म्हणजे मॅच विनर ठरलेला के एल राहुलची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिची.(T20 World Cup Athiya Shetty supporting KL Rahul in Australia)

एडिलेड मैदानावर टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल जबरदस्त खेळला. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये अपयशी ठरत असल्याने त्याच्यावर टीका सुरु होती. मागच्या तीन सामन्यात तो फेल गेला होता. त्यामुळे केएल राहुलला बाहेर काढा अशी मागणी क्रिकेटप्रेमी करत होते. मात्र, राहुललने रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने 31 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याची ही खेळी पाहता क्रिकेट जगतात अभिनेत्री अथिया शेट्टीच्या पायगुणाच्या चर्चा रंगली आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे नाते सर्वश्रुत आहे. अनेकवेळा अथिया मैदानावर केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी उपस्थिती दर्शवते. बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यातही तिने आपली हजेरी लावली होती. राहुलने अर्धशतक झळकावताच अथिया शेट्टीने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. इतकेच नव्हे तर तिने के एल राहुलला टॅग तर हर्टचा इमोजीदेखील शेअर केला.

Athiya Shetty story
Athiya Shetty story

कॅप्टन रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यावेळी टीमला एका चांगल्या भागीदाराची आवश्यकता होती. राहुलने विराटच्या साथीने डाव सावरला. बांग्लादेशच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. त्याने आज 31 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

हेही वाचा: राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये अपयशी ठरत असल्याने के एल राहुलवर टीका सुरु होती. मागच्या तीन सामन्यात तो फेल गेला होता. के एल राहुल गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. मोठ्या सामन्यांमध्ये राहुल धावा करण्यात अपयशी ठरत होता.. .ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक सामन्यात तो अवघ्या एका धावेवर बाद झाला.

KL Rahul
T20 World Cup : भारत पोहचणार! पाकिस्तानला अजूनही आहे का सेमी फायनलची संधी?

याआधी आशिया चषकात श्रीलंकेविरुद्ध त्याने ३६ धावा केल्या होत्या. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात त्याने केवळ २८ धावा केल्या. टी-20 विश्वचषकातही राहुल तीन धावा काढून बाद झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही तो स्वस्तात बाद झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com