T20 World Cup Final: इंग्लंड-पाकिस्तान सामन्यापूर्वी PM सुनक यांचा इंग्लंड संघाला 'विशेष संदेश'

Rushi Sunak
Rushi SunakSakal

T20 World Cup Final: पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये t20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे हा सामना खेळवला जात असून या सामन्याआधी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपल्या खेळाडूंना विशेष संदेश दिला आहे.

(T20 World cup Final Latest Updates)

"पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या फायनलसाठी इंग्लंडच्या क्रिकेट संघाला शुभेच्छा. मी तुमच्या पाठीशी आहे" असं सुनक म्हणाले. त्याचबरोबर इंग्लंडच्या अनेक समर्थकांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर पाकिस्तान संघालाही अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत १९० ते २०० धावा करण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे. तर हा कप कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com