esakal | गब्बरचा पत्ता कट करणारा हिरो T 20 वर्ल्ड कपच्या रंगीत तालमीत फ्लॉप
sakal

बोलून बातमी शोधा

Shikhar Dhawan

धवनचा पत्ता कट करणारा हिरो T 20 वर्ल्ड कपच्या रंगीत तालमीत फ्लॉप

sakal_logo
By
सुशांत जाधव

ज्या युएईच्या मैदानात आयपीएलची स्पर्धा सुरुये त्याच मैदानात टी-20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेकडे वर्ल्ड कपची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. आयपीएल हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाची निवड झाली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये. अनुभवी शिखर धवनचा पत्ता कट करुन ज्या ईशान किशनला वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात घेण्यात आले तो सपशेल अपयशी ठरला.

आयसीसीच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम नावे असलेल्या शिखर धवनला टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळून निवड समितीने मोठी चूक केली आहे, असेच काहीसे चित्र आयपीएलमधील सामन्यातून स्पष्ट होत आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या शिखर धवनने टी-20 प्रकारात अजूनही आपण जबऱ्या कामगिरी करु शकतो, हे दाखवून दिले आहे. दुसरीकडे त्याच्या जागी संधी मिळालेला आणि मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणारा ईशान किशन सपशेल अपयशी ठरताना दिसते.

हेही वाचा: रोहितच्या झाकल्या मुठीला रितिका जाम घाबरली; व्हिडिओ व्हायरल

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन टॉप तीनमध्ये आहे. 13 सामन्यात त्याने 41.75 च्या सरासरीनं 501 धावा केल्या आहेत. यात 92 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. धवनच्या खात्यात तीन अर्धशतकांचीही नोंद आहे. ईशान किशन मुंबई इंडियन्सकडून केवळ 8 सामने खेळला असून 13.37 च्या सरासरीने त्याने अवघ्या 107 धावा केल्या आहेत. यात 28 ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. मागील हंगामात ईशान किशनने 14 सामन्यात 500 + धावा केल्या होत्या.

हेही वाचा: IPL 2021: अश्विनला हेटमायरच्या आधी का पाठवलं? पंत म्हणतो..

IPL च्या सलग सहाव्या हंगामात 400 पेक्षा अधिक धावा

2016 पासून 2021 पर्यंतच्या आयपीएल हंगामात शिखर धवनने आपल्यातील क्षमता दाखवून दिलीये. 2016, 2017, 2018, 2019,2020 आणि 2021 च्या हंगामात त्याने 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 2011 आणि 2012 मध्येही त्याने 400 हून अधिक धावा केल्या आहेत.

loading image
go to top