esakal | IPL 2021: अश्विनला हेटमायरच्या आधी का पाठवलं? ऋषभ पंत म्हणतो... | R Ashwin
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021: अश्विनला हेटमायरच्या आधी का पाठवलं? पंत म्हणतो..

दिल्लीने चेन्नईला पराभूत करून गुणतालिकेत पटकावलं अव्वल स्थान

IPL 2021: अश्विनला हेटमायरच्या आधी का पाठवलं? पंत म्हणतो..

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 CSK vs DC: दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीसमोर तगडी फलंदाजी असलेला चेन्नईचा संघ केवळ १३६ धावाच करू शकला. CSKची सलामी जोडी ऋतूराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी संघाला चांगली सुरुवात करू दिली. पण मोठी खेळी करण्याचा त्यांना प्रयत्न फसला. गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजांची थोडीशी तारांबळच उडाली. पण दिल्लीने कसेबसे आव्हान गाठले. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने धडाकेबाद फलंदाज शिमरॉन हेटमायरच्याही आधी रविचंद्रन अश्विनला पाठवलं होतं. त्यामागे नक्की काय विचार होता, यावर ऋषभ पंतने उत्तर दिलं.

हेही वाचा: IPL 2021 : पंतला बर्थडे गिफ्ट; CSK ला पराभूत करत DC टॉपला

सामना संपल्यानंतर ऋषभ पंतला अश्विनच्या फलंदाजीच्या क्रमांकाबद्दल केलेल्या बदलाचा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना पंत म्हणाला, "वाढदिवसाच्या दिवशी संघ जिंकला हे नक्कीच चांगलं गिफ्ट आहे. पॉवरप्लेमध्ये चेन्नईच्या संघाने आक्रमकपणा दाखवला होता. पण आमच्या गोलंदाजांनी नंतर त्यांना संयमी खेळी करण्यास भाग पाडले. फलंदाजी करणं थोडं अवघड होतं. पण अश्विनला हेटमायरच्या आधी पाठवण्यामागचा हेतू म्हणजे उजव्या-डाव्या (Right Left Combination) खेळाडूंची जोडी मैदानात असावी असा विचार होता."

हेही वाचा: "तरच पुढच्या IPL मध्ये दिसेल धोनी"

धोनीने कासवछाप खेळीवर दिली प्रतिक्रिया-

"या पिचवर फलंदाजी करणं सोपं नव्हतं. पिच फलंदाजीसाठी खूपच संथ होतं. चेंडू संथगतीने बॅटवर येत होता. आम्हाला १५० धावांचा टप्पा गाठायचा होता. जर आम्ही दीडशे धावांपर्यंत पोहोचलो असतो तर खेळ अधिक रंगतदार झाला असता. संथ खेळपट्टीमुळे आम्हाला अपेक्षित धावगती मिळू शकली नाही. फलंदाजीचा कस दिल्लीच्या डावातही लागला", असं स्पष्टीकरण धोनीने दिलं. धोनीने २७ चेंडूंचा सामना करत १८ धावांची खेळी केली. त्यात त्याने एकही चौकार किंवा षटकार लगावला नाही.

loading image
go to top