esakal | रोहितच्या झाकल्या मुठीला रितिका जाम घाबरली; व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

रोहितच्या झाकल्या मुठीला रितिका जाम घाबरली; व्हिडिओ व्हायरल

रोहितच्या झाकल्या मुठीला रितिका जाम घाबरली; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफसाठी संघर्ष करत आहे. सध्याच्या घडीला त्यांची अवस्था कठीण आहे. मुंबई इंडियन्सचा प्रवास कायम राहणार की त्यांना प्लेऑफशिवाय माघारी फिरावे लागणार? या चर्चेदरम्यान कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) इन्स्टा अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात रोहित पत्नी रतिकाला फ्रँक करताना दिसते.

रोहित शर्मा आपल्या मुठीमध्ये चॉकलेट घेऊन रितिकासमोर जातो. तिला ती मुठ उघडण्यास सांगतो. पण रितिका चांगलीच घाबरलेली दिसते. तिला रोहितची मुठ उघडण्याचे धाडस होत नाही. यावेळी रितिका कावरी-बावरी होऊन मागे रोहितपासून दूर जाताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IPL 2021: अश्विनला हेटमायरच्या आधी का पाठवलं? पंत म्हणतो..

रोहितनं गम्मत करण्याच्या दृष्टिने मुठीत काहीतरी भितीदायक वस्तू घेतल्याचा संशय रितिकाच्या मनात येतो. रोहितच्या विनंतीवरुन अखेर ती धाडस करुन रोहितच्या मुठीत काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करते. चॉकलेट पाहिल्यानंत ती सुटकेचा निश्वास टाकते.

हेही वाचा: Video: ब्राव्होच्या हातून चेंडू निसटला, हवेत उडाला अन्...

पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावलेल्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संघर्षमय राहिला आहे. 12 सामन्यात केवळ 5 सामने जिंकून त्यांनी 10 गुण कमावले आहेत. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. याशिवाय रनरेट आणि कोलकाता नाईट रायडर्सचा निकाल यावरही त्यांची गणितं अवलंबून असतील.

loading image
go to top