

Tajinderpal Toor Wins Silver Medal | Asian Games 2026
Sakal
Tajinderpal Singh Toor wins Asian Games Silver Medal in Shot Put: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत ऍथलेटिक्समध्ये शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एक पदक आले आहे. भारताचा अनुभवी गोळाफेकपटू तेजिंदरपाल सिंग तूर याने शनिवारी रौप्य पदक जिंकले. मात्र त्याची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकांची हॅट्रिक (Hat-Trick of Gold) साधण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली.