भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 'ही' गोष्ट महत्त्वाची- गांगुली

Virat-Kohli-Team-India
Virat-Kohli-Team-India
Summary

भारताचा सलामीचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार

T20 World Cup स्पर्धेची सुरूवात उद्यापासून होणार आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजेच पात्रता फेरीचे सामने उद्यापासून सुरू होणार आहेत. त्यानंतर २२ तारखेपासून मूळ स्पर्धेला सुरूवात होणार असून भारताचा सलामीचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. यंदाच्या भारतीय संघात अनुभव आणि युवा खेळाडू असा समतोल साधण्यात आला आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर कोणत्या गोष्टीची सर्वाधिक गरज आहे? याबद्दल BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं.

Virat-Kohli-Team-India
राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच! T20 वर्ल्ड कपनंतर स्वीकारणार कार्यभार

"कोणताही संघ सहज विजेता बनत नाही. केवळ स्पर्धेत उतरल्याने स्पर्धेचे विजेतेपद मिळत नाही. त्यांना एका प्रक्रियेतून जावं लागतं. भारताच्या संघात प्रतिभा आहे पण त्यांना परिपक्वता दाखवून खेळ करावा लागेल. भारतीय खेळाडू अतिशय प्रतिभावान आहेत, त्यांच्यात धावा करण्याचे कौशल्य आहे, त्यांच्याशिवाय ते योग्य वेळी बळीदेखील टिपू शकतात. पण महत्त्वाचे म्हणजे त्यांना मानसिकदृष्ट्या शांत आणि संयमी राहणं गरजेचं आहे. ते केल्यास त्यांना कोणीही हरवू शकत नाही", असं सौरव गांगुलीने स्पष्ट केले.

Virat-Kohli-Team-India
T20 World Cup: मराठमोळ्या शार्दूलची 'टीम इंडिया'मध्ये एन्ट्री!!
Sourav-Ganguly
Sourav-Ganguly

BCCIच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल द्रविड याच्याशी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी चर्चा केली. या बैठकीत द्रविडने २०२३ पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळण्यास होकार दिला. राहुल द्रविडला दोन वर्षांसाठी करारबद्ध केलं असून त्यासाठी BCCI ने १० कोटींचे मानधन मान्य केल्याचीही माहिती मिळाली आहे. तसेच, द्रविड याचा विश्वासू पारस म्हांबरे याची गोलंदाजी प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. तर, विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षकपदी कायम असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com