WTC Point Table : रोहित सेनेची मोठी उसळी; दक्षिण आफ्रिकेचा अभेद्द किल्ला घेतलाच, अव्वल स्थानही हिसकावलं

WTC Point Table
WTC Point Table ESAKAL

WTC Point Table : भारतीय संघाने केप टाऊनमधील कसोटी जिंकत इतिहास रचला. भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन कसोटी जिंकली. याचसोबत मालिका 1 - 1 अशी बरोबरी केली. भारताने आफ्रिकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला. पहिल्या डावात भारताने आफ्रिकेचा संपूर्ण संघ 55 धावात गारद केला होता.

WTC Point Table
Rohit Sharma : इतिहास रचला... मालिका बरोबरीत सोडवली तरी रोहित एका गोष्टीवर नाराज

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका झाल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पाईंट टेबल अपडेट झालं. त्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेची अव्वल स्थानावरून घसरण झाली.

भारताने 54.16 विनिंग पर्सेंटेज घेत अव्वल स्थान पटकावलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे विनिंग पर्सेंटेज हे 50 वर आले आहे. ते सध्या दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. पाकिस्तान संघाची देखील घसरण झाली असून ते पाचव्यावरून सहाव्या स्थानावर घसरली. त्यांचे विनिंग पर्सेंटेज 45.83 इतके आहे.

WTC Point Table
Rohit Sharma On Pitch : अशा खेळपट्टीवर खेळायला अडचण नाही फक्त भारतात आल्यावर... रोहित शर्माचं कडक उत्तर

भारताने दक्षिण आफ्रिकेला सात विकेट्सने मात दिली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केप टाऊन येथे झाला. हा समना अवघ्या पाच सत्रात संपला. सेंच्युरियनवर भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीत संघाने जोरदार पुनरागमन केलं.

भारताचा यंदाचा दक्षिण आफ्रिका दौरा यशस्वी ठरला. पावसामुळे बाधित झालेली टी 20 मालिका भारताने 1 - 1 अशी बरोबरीत सोडवली. तर तीन वनडे सामन्यांची मालिका 2 - 1 अशी खिशात टाकली. कसोटी मालिका देखील 1 - 1 अशी बरोबरीत राहिली.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com