Hardik Pandya: धक्कादायक! टीम इंडियाचा टी-20 कर्णधार करणार पुन्हा लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya 2nd Time Marriage

Hardik Pandya: धक्कादायक! टीम इंडियाचा टी-20 कर्णधार करणार पुन्हा लग्न

Hardik Pandya 2nd Time Marriage : टीम इंडियाचा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या सध्या ब्रेकवर आहे. हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक लाइफ मुळे अनेकदा चर्चेत असतो. अशाच एका कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार आहे. हार्दिक पांड्याने 2020 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत कोर्ट मॅरेज केले होते. हे जोडपे अगस्त्य या मुलाचे पालकही आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक पुन्हा एकमेकांशी लग्न करणार आहेत. हे जोडपे 14 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये एका भव्य समारंभात लग्नबंधनात अडकणार आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांचा विवाह सोहळा 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 16 पर्यंत चालणार आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी यापूर्वी कोर्टात लग्न केले होते. जेव्हा हे घडले तेव्हा सर्व काही घाईत होते. तेव्हापासून त्याच्या मनात भव्य लग्नाची कल्पना होती. त्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. या कार्यक्रमात हळद, मेहंदी आणि संगीत होणार आहे.

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती 2014 मध्ये बिग बॉसच्या सीझन 8 मध्ये दिसली होती. 2018 मध्ये नताशा शाहरुख खानच्या झिरोमध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती. नताशा स्टॅनकोविक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नताशा तिच्या हॉटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते.