INDvsSL: दुसऱ्या टी-20मध्ये भारतासमोर श्रीलंका चारीमुंड्या चीत 

team india won second t20 vs sri lanka at indore
team india won second t20 vs sri lanka at indore

इंदौर : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आज, भारताने सगळ्याच पातळीवर चांगली कामगिरी करत, श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळवला. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळं श्रीलंकेचा डाव 9 बाद 142 धावांवर संपुष्टात आणण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. त्यानंतर फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावत संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून सलामीवीर केएल राहुलनं सर्वाधिक 45 धावा केल्या. भारतीय खेळाडू्ंनी चौफेर कामगिरी करत, श्रीलंकेला चारीमुंड्या चीत केलंय. भारतानं या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीय.

दमदार सलामी 
भारताचे सलामीवर केएल राहुल आणि संघात पुरागमन करणारा शिखर धवन यांनी 143 धावांचं टार्गेट गाठण्यासाठी सावध सुरुवात केली होती. दोघांनी 71 धावांची दमदार सलामी करून दिली. त्यावेळी आक्रमक खेळत असणारा राहुल वैयक्तिक 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरनं 34 धावा करत शिखरला साथ दिली. पण, शिखर वैयक्तिक 32 धावांवर बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 117 होती. त्यामुळं विजय दृष्टीपथात आला होता. श्रेयस 30 धावांवर बाद झाल्यानंतर कॅप्टन विराट कोहली (30) आणि रिषभ पंत यांनी विजयाची औपचारिकता पार पाडली. 

गोलंदाजांची चांगली कामगिरी!
तत्पूर्वी, दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारलेल्या टीम इंडियानं श्रीलंकेला 142 धावांवर रोखलंय. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळं श्रीलंकेला दीडशतकी मजलही मारता आली नाही. त्यांच्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या परेरानं सर्वाधिक 34 धावा केल्या. भारताकडून, शार्दुल ठाकूरनं 23 धावा देऊन तीन बळी घेतले तर, कुलदीप यादवनं 38 धावा देत दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टन सुंदर (1), सैनी (2) आणि बुमराह (1) यांनी शार्दुलला चांगली साथ दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com