Shakib al Hasan |VIDEO : पंचांचे पाकिस्तानला झुकते माप; शाकिबच्या 'वादग्रस्त' निर्णयावर शादाब म्हणतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shakib al Hasan Controversial Decision

Shakib al Hasan |VIDEO : पंचांचे पाकिस्तानला झुकते माप; शाकिबच्या 'वादग्रस्त' निर्णयावर शादाब म्हणतो...

Shakib al Hasan Controversial Decision : यंदाचा टी 20 वर्ल्डकप हा पंचांच्या वादग्रस्त निर्णयांनी गाजला आहे. त्यात आजच्या पाकिस्तान बांगलादेश सामन्यातील एका निर्णयाची देखील भर पडली आहे. तिसऱ्या पंचांनी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला ज्या पद्धतीने बाद ठरवले ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. दरम्यान, भारताला आयसीसी झुकते माप देते असा आरोप करणाऱ्या पाकिस्तानचा गोलंदाज शादाब खानला याबाबत विचारले तर त्यावेळी त्याने पंचांचा निर्णय म्हणत हात झाडले. शादाब खाननेच 11 व्या षटकात शाकिबला बाद केले होते.

हेही वाचा: T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दुबळ्या संघांनी केली क्रांती! तब्बल सहा अपसेट

सौम्या सरकार आणि शांतोने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी बांगलादेशला 10 षटकता 73 धावांपर्यंत पोहववले. सरकार आणि शांतो अर्धशतकी (52) भागीदारी रचली. ही जोडी पाकिस्तानची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शादाब खानने सामन्याच्या 11 व्या षटकात सौम्या सरकारला 20 तर कर्णधार शाकिबला पुढच्याच चेंडूवर शुन्यावर बाद करत बांगलादेशला दोन मोठे धक्के दिले. शाकिबचा निर्णय वादग्रस्त ठरला. एकतर मैदानावरील पंचांनी खूप उशीराने निर्णय दिला.

हेही वाचा: BAN vs PAK : पाकिस्तानची सेमी फायनलच्या दिशेने कूच; बांगलादेशला स्वस्तात गुंडाळले

त्यानंतर शाकिबने वेळ न दडवडचा लगेचच डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये चेंडू शाकिबच्या बॅटला लागून गेल्याचे दिसत होते. स्निकोमिटरवर स्पाईक स्पष्टपणे दिसत होते. मात्र तरी देखील तिसऱ्या पंचांनी शाकिबला बाद ठरवले. सोशल मीडियावर सध्या याबाबत पोस्ट व्हायरल होत आहेत.

दरम्यान, बांगलादेशचा डाव संपल्यानंतर ज्या शादाब खानला शाकिबची विकेट मिळाली त्याला या वादग्रस्त निर्णयाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने 'शाकिबला पंचांनी बाद ठरवले आहे तर तो बाद आहे.' असे उत्तर दिले. दरम्यान, भारत बांगलादेश सामन्यानंतर आयसीसी भारताला झुकते माप देते अशी ओरड पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी केली होती. या प्रकरणावर मात्र त्यांच्या तोंडातून ब्र देखील निघण्याची शक्यता नाही.