esakal | ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न कोरोनामुळे भंगलं; 17 वर्षीय टेनिस स्टारची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न कोरोनामुळे भंगलं; 17 वर्षीय टेनिस स्टारची माघार

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं आपण ऑलिम्पिकमध्ये खेळणार नसल्याचं 17 वर्षीय टेनिस स्टारने सांगितलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न कोरोनामुळे भंगलं; 17 वर्षीय टेनिस स्टारची माघार

sakal_logo
By
सूरज यादव

टोकियो - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होत आहे. आतापर्यंत काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन फुटबॉल खेळाडू असल्याचं दक्षिण आफ्रिका संघाने जाहीर केलं होतं. त्यात आता अमेरिकेची टेनिस स्टार कोको गॉफलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर कोकोने टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं आपण ऑलिम्पिकमध्ये खेळणार नसल्याचं 17 वर्षीय टेनिस स्टारने सांगितलं आहे. कोकोने ट्टिवट करून सांगितलं की, मला हे सांगताना वाईट वाटतंय की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे टोकियोमध्ये मी खेळू शकणार नाही.

ऑलिम्पिकमध्ये खेळणं, अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणं हे माझं स्वप्न होतं आणि आशा आहे की भविष्यात मला ही संधी मिळेल अशी आशाही कोकोने व्यक्त केली आहे. कोकोने अमेरिकेच्या संघाला ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा दिल्या. गॉफने विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत धडक मारली होती. त्यात तिला अँजेलिक कर्बरने 4-6, 6-4 ने पराभूत केलं होतं. सतरा वर्षीय कोको गॉफ ही WTAच्या रँकिंगमध्ये 25 व्या स्थानी आहे

हेही वाचा: Tokyo Olympics: जपानी मुलीवर बलात्कार; 30 वर्षीय तरूणाला अटक

ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंना स्पर्धेआधी पाच दिवस त्याठिकाणी येण्यास सांगितलं आहे. तसंच प्रत्येकाला दररोज चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सकाळी नऊ किंवा सायंकाळी सहा वाजता चाचणीसाठी नमुने दिले जातात. त्यानंतर पुढच्या १२ तासात अहवाल मिळेल असं सांगण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया संघासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ विलगीकरणात आहे. संबंधित पदाधिकारी पुन्हा करण्यात आलेल्या चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचंही सांगण्यात आलं आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून कोणाशीही संपर्क होणार नाही याची काळजी घेत असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा: Olympics 2020 : ... म्हणून नीरजकडून पदकाची अपेक्षा

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेला 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. 8 ऑगस्टपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धा पार पडतील. ऑलिम्पिक गावात राहणाऱ्या दोन खेळाडूंसह एकूण तिघेजण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता सोमवारी आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मात्र यात कोणताही खेळाडू नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

loading image