धोनीबद्दलच्या उत्तरानं विराटनं जिंकली मनं

धोनीबद्दलच्या उत्तरानं विराटनं जिंकली मनं

धोनीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरानं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी सर्व खेळाडू विलगीकरणात आहे. या मोकळ्या वेळात भारतीय कर्णधार विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. विराट कोहलीनं दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धोनीबद्दलच्या नात्याला दोन शब्दात व्यक्त कर? असं विराट कोहलीला इन्स्टाग्रावर एका चाहत्यानं विचारलं होतं.

विराट कोहलीनं धोनीबद्दलचं आपलं नातं 'विश्वास' आणि 'सन्मान'वर आधारित अससल्याचं सांगत सर्वांची मनं जिंकली. विराट कोहलीच्या उत्तरानं नेटकरी आणि धोनी चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. गतवर्षी आर. अश्विनसोबत इन्स्टाग्राम चॅटमध्येही विराटनं धोनीची स्तुती केली होती. त्यावेळी विराट म्हणाला होता की, मला कर्णधार करण्यात धोनीचा मोलाचा वाटा आहे.

धोनीबद्दलच्या उत्तरानं विराटनं जिंकली मनं
WTC final कपिल देवचं मोठं वक्तव्य

मुलीचा चेहरा कधी दाखवणार?

विरुष्काच्या मुलीला पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत. एका चाहत्याने विराटला मुलीचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

वामिका हे दुर्गा देवीचं नाव

विराटला एका फॅनने प्रश्न विचारला की, वामिका याचा अर्थ काय होतो? ती कशी आहे? आणि मी तिला पाहू शकतो का? तेव्हा विराट म्हणाला की, 'वामिका हे दुर्गा देवीचं दुसरं नाव आहे. वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही, आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तिला समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.'

धोनीबद्दलच्या उत्तरानं विराटनं जिंकली मनं
WTC Final : तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

दरम्यान, विराटसह टीम इंडियातील अनेक खेळाडू हे सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन आहेत. विराट सेना पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान साउथम्प्टन मैदानात हा सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com