FIFA World Cup 2022 : विश्वविजेत्या फ्रान्सवर पराभवाची नामुष्की; ट्युनिशियाने विजयी रथ रोखला

Tunisia Defeat World Champion France
Tunisia Defeat World Champion France ESAKAL

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्डकपमध्ये आज मोठा उलटफेर झाला. विश्वविजेत्या फ्रान्सचा ट्युनिशियाने 1 - 0 असा पराभव केला. फ्रान्सचा हा 2014 नंतरचा वर्ल्डकपमधील पहिला पराभव आहे. तर ग्रुप D मधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कचा 1- 0 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. जरी ट्युनिशियाने फ्रान्सला पराभवाचा धक्का दिला असला तरी त्यांना बाद फेरी मात्र गाठता आली नाही. फ्रान्सने ट्युनिशियाशी बरोबरी साधण्याचा शेवटच्या सेकंदापर्यंत प्रयत्न केला. ग्रीझमनने स्टॉपेज टाईमच्या 10 व्या मिनिटाला गोल केला खरा मात्र रेफ्रींनी VAR नंतर हा गोल अवैध ठरवला.

Tunisia Defeat World Champion France
Shikhar Dhawan : न्यूझीलंड दौऱ्याची सांगता होताच धवनचे बांगलादेश दौऱ्याबाबत मोठे वक्तव्य

फ्रान्स आणि ट्युनिशिया यांच्यातील सामना पहिल्या हाफपासूनच चुरशीचा राहिला. बलाढ्य फ्रान्सने ट्युनिशियाच्या गोलपोस्टवर आक्रमक चढाया केल्या. मात्र फ्रान्सला पहिल्या हाफमध्ये गोल करता आला नाही. दुसऱ्या हाफमध्ये ट्युनिशियाने फ्रान्सवर पहिला गोल करत विश्वविजेत्यांना मोठा धक्का दिला. वाहबी खाझरीने 58 व्या मिनिटाला लौडोनीच्या सहाय्याने गोल डागला. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या फ्रान्सने आपली अव्वल फळी मैदानात उतरवली एम्बाप्पे आणि ग्रीझमन मैदानात आले. मात्र या दोघांनाही 90 मिनिटापर्यंत बरोबरीचा गोल करता आला नाही.

दरम्यान, स्टॉपेज टाईंमच्या 10 व्या मिनिटाला ग्रीझमवने गोल केला खरा मात्र रेफ्रीने हा गोल VAR नंतर अवैध ठरवला. यामुळे अखेच्या क्षणी पराभवाची नामुष्की टाळण्याचा फ्रान्सचा प्रयत्न देखील फेल गेला. फ्रान्सचा हा वर्ल्डकपमधील सलग सहा विजयानंतरचा पहिला पराभव ठरला.

Tunisia Defeat World Champion France
Vijay Hazare Trophy : कर्नाटक महाराष्ट्राशी फायनल खेळण्यापूर्वीच झाला गारद

ग्रुप D मधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कचा 1 - 0 असा पराभव केला. या सामन्यात देखील पहिला हाफ हा गोलशून्य बरोबरीत राहिला. मात्र दुसऱ्या हाफमध्ये ऑस्ट्रेलियाने 60 व्या मिनिटाला आपला पहिला गोल करत आघाडी घेतली. मॅथ्यू लेकैने मॅग्रीच्या असिस्टवर गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर डेन्मार्कने हा गोल फेडण्यासाठी जोरदार आक्रमक चढाया केल्या. मात्र डेन्मार्कला काही बरोबरी साधता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामने कधीही जिंकता आले नव्हते. याचबरोबर सहा वर्ल्डकप खेळलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा ग्रुप स्टेज पार केली आहे.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com