U19 Asia Cup : एकाच दिवसात दोन मोठे अपसेट! भारत-पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; 'या' दोन संघात होणार फायनल

U19 Asia Cup
U19 Asia Cup sakal

U19 Asia Cup : अंडर-19 आशिया कपमध्ये 15 नोव्हेंबरला शुक्रवारी दोन मोठे अपसेट पाहिला मिळाले. यूएईने पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशने भारताविरुद्ध विजय मिळवला. 17 डिसेंबर रोजी दुबई येथे बांगलादेश आणि यूएई यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अरिफुल इस्लाम (94) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मारूफ मृदा (4/41) यांच्या कामगिरीमुळे बांगलादेशने भारताचा चार गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत स्थान पक्के केले.

U19 Asia Cup
Schoolympics 2023 : सोहम, यशश्रीला ॲथलेटिक्स स्पर्धेत जेतेपद

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशचा कर्णधार महफुजुर रहमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांच्या ठराविक अंतराने विकेट्स घेत राहिले. सलामीची जोडी 10 धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतली.

भारतीय संघासाठी केवळ मुशीर खान (50) आणि मुरुगन अभिषेक (62) यांनाच मोठी खेळी करता आली. याशिवाय एकाही फलंदाजाला 19 धावांच्या पुढे जाता आले नाही. 6 खेळाडूंना दुहेरी अंकही स्पर्श करता आला नाही. अशाप्रकारे भारतीय संघ 42.4 षटकांत 188 धावांवरच मर्यादित राहिला. बांगलादेशकडून मारूफ मृदाने चार बळी घेतले.

U19 Asia Cup
Hardik Pandya MI Captain : हार्दिक मुंबईचा नवा किंग; अखेर रोहितला बाजूला केलंच

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. 34 धावांपर्यंत आघाडीचे तीनही फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. येथून अरिफुल इस्लामने 90 चेंडूत 94 धावा आणि अहरार अमीनने 101 चेंडूत 44 धावा करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. दोघांमध्ये 138 धावांची भागीदारी झाली.

एकूण 172 धावांवर आरिफुल बाद झाला. यानंतर बांगलादेशचा संघ गडबडला आणि परत दोन विकेट गमावल्या पण त्यांना सामना जिंकण्यापासून रोखता आला नाही. भारतीय संघाकडून नमन तिवारीने तीन आणि राज लिंबानीने दोन गडी बाद केले.

पाकिस्तान-यूएई सामन्यात काय घडलं?

पहिल्या उपांत्य सामन्यात यूएईने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. कर्णधार अयान खानच्या 55 (57 चेंडू) आणि सलामीवीर आर्यांश शर्माच्या 70 चेंडूत 46 धावांच्या जोरावर यूएईने 193 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानचा संघ तीन चेंडू शिल्लक असताना 182 धावांवर सर्वबाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com