युवा टीम इंडिया जिंकली रे! पाचव्यांदा उंचावला अंडर 19 वर्ल्ड कप

ICC U19 World Cup 2022 India U19 vs England U19 Final
ICC U19 World Cup 2022 India U19 vs England U19 FinalSakal

ICC U19 World Cup 2022 India U19 vs England U19 Final : वेस्ट इंडीजमधील आँटिगाच्या मैदानात यश धूलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने (India U19) इतिहास रचला. इंग्लंड संघाला England U19 पराभूत करत भारताने विक्रमी नवव्यांदा फायनल खेळताना पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्टनं (Tom Prest) नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी त्याचा निर्णय फोल ठरवला. रवी कुमारने (Ravi Kumar) सामन्याच्या सुरुवातीलाच संघाला ठराविक अंतराने दोन विकेट्स मिळवून दिल्या. त्यानंतर सलामीवर जॉर्ज थॉमसला बाद करत राज बावानं (Raj Bawa) आपले विकेट्सचे खाते उघडले. त्याने निम्मा संघ गारद केला.

आघाडीचे फलंदाज ठराविक अंतराने तंबूत परतत असताना जेम्स रीवनं (James Rew) इंग्लंडकडून एकाकी झुंज दिली. त्याने116 चेंडूत केलेल्या 95 धावांच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने 44.5 षटकात 189 पर्यंत मजल मारली. तळाच्या फलंदाजीत जेम्स सेल्सनं नाबाद 34 धावांची खेळी केली.

ICC U19 World Cup 2022 India U19 vs England U19 Final
VIDEO : तांबेचा सुपर कॅच; जेम्स 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

या धावसंख्येचा पाठलाग करताना युवा टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या शेख राशीद (Shaik Rasheed) याने सलामीवीर हरनूर सिंगच्या (Harnoor Singh) च्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. थॉमसनं 21 धावांवर खेळणाऱ्या हरनूर सिंगला तंबूत धाडत भारतीय संघाला आणखी एक धक्का दिला. सेमी फायनलमध्ये शतकी खेळी करणारा कर्णधार यश धूल (Yash Dhull) जेम्सनं 17 धावांवर माघारी धाडले. राशीदने (Shaik Rasheed)अर्धशतक पूर्ण करुन कर्णधारापाठोपाठ तंबू गाठला. त्याने 84 चेंडूत 6 l चौकाराच्या मदतीने 50 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ICC U19 World Cup 2022 India U19 vs England U19 Final
U19 World Cup: कोण आहे राज बावा?; ज्यानं फायनलमध्ये केलीये हवा!

त्यानंतर राज बावा (Raj Bawa) आणि निशांत सिंधूनं (Nishant Sindhu) पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत भारतीय संघाला विजयाच्या समीप आणले. 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 चेंडूत 35 धावा करुन राज बावा बाद झाला. जोशुआच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग पक्का केला होता. अखेरच्या षटकात निशांतनं अर्धशतक पूर्ण केले. दिनेश बानानं उत्तुग षटकार खेचत धोनी स्टाईलमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com