P V Sindhu : सिंधूचा कॅरोलिनासोबत झाला शाब्दिक वाद, मिळालं पिवळं कार्ड

P V Sindhu
P V Sindhuesakal

PV Sindhu Controversy : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या फॉर्मला सध्या ग्रहण लागलं आहे. मात्र डेन्मार्क ओपनमध्ये सिंधूने सेमी फायनलपर्यंत धडक मारली. तिचा मुकाबला स्पेनची अव्वल बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीन सोबत होता. मात्र या सामन्यात सिंधूचा 18 - 21, 21 - 19, 7 - 21 असा पराभव झाला. कॅरेलिनाविरूद्धचा हा सिंधूचा पाचवा पराभव ठरला.

या सामन्याला वादाचं गोलबोट देखील लागलं. सिंधू आणि कॅरोलिना यांच्यात शाब्दिक वाद झाला अन् पंचांनी दोघींनाही पिवळे कार्ड दाखवले.

P V Sindhu
SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्यांच्या उडवल्या ठिकऱ्या; इंग्लंड गुणतालिकेत आली अफगाणिस्तानच्या पंक्तीत

स्पेनच्या कॅरोलिना आणि सिंधूची रायव्हलरी ही तशी जुनी आहे. कॅरोलिनाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक फायनल आणि 2018 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंधूचा पराभव केला होता.

जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असलेल्या सिंधूने सहाव्या स्थानावर असलेल्या कॅरोलिनाविरूद्ध पहिल्या गेममध्ये झुंजार खेळ केला. मात्र पहिला गेम तिला जिंकता आला नाही.

दुसऱ्या गेममध्ये झुंजार सिंधूने 21 - 19 असा विजय मिळवला. सामन्यातील प्रत्येक गुणाला दोन्ही खेळाडूंनी आक्रमकपणे सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर पंचांनी दोघींनाही ताकीद दिली होती आणि त्यांचे आक्रमक सेलिब्रेशन थोडं कमी करण्यास सांगितलं होतं.

P V Sindhu
Netherlands vs Sri Lanka : रडत खडत का असेना लंकेनं खातं उघडलं; नेदरलँडचं कडव आव्हान लावलं परतवून

मात्र मरिन सेलिब्रेशन करताना जास्तच ओरडत होती. तर सिंधूला सर्व्ह रिसिव्ह करताना जास्त वेळ घेत होती त्यामुळे दोनवेळा ताकीद दिली. मरिनला पहिला गेम जिंकल्यानंतर मोठ्याने सेलिब्रेशनसाठी ताकीद मिळाली होती.

निर्णायक गेममध्ये अंपायरनी भारताच्या बॅडमिंटनपटूला सर्व्हिस रिसिव्ह करण्यास लवकर उभे राहण्याची सुचना मिळाली होती. त्यावेळी सिंधूने पंचांना तुम्ही तिला मोठ्याने ओरडण्यास परवानगी देता. त्यामुळे आधी तिला सांगा मग मी तयार होईन असे सांगितले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com