Under 19 Asia Cup 2025 Begins in Dubai
ESAKAL
आशियाई करंडक (१९ वर्षांखालील) या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेला आजपासून दुबईमध्ये सुरुवात होत आहे. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा सलामीचा सामना संयुक्त अरब अमिराती संघाशी असणार आहे. मलेशिया-पाकिस्तान ही लढतही याच दिवशी रंगणार आहे. वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रे यांसारखे भारतीय युवा खेळाडू स्पर्धेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहेत; मात्र या स्पर्धेमध्ये आणखी एका मुद्द्याकडे विशेष लक्ष असेल.