esakal | VIDEO : षटकार-चौकारांची बरसात; उन्मुक्त चंदचा अमेरिकेत धमाका
sakal

बोलून बातमी शोधा

 unmukt chand

VIDEO : षटकार-चौकारांची बरसात; उन्मुक्त चंदचा अमेरिकेत धमाका

sakal_logo
By
सुशांत जाधव

रणजी क्रिकेटमध्ये खेळून टीम इंडियासाठी खेळण्याची स्वप्नं पाहणाऱ्या उन्मुक्त चंदने BCCI ला रामराम ठोकत अमेरिकन क्रिकेटची वाट धरली. भारतीय क्रिकेटमधील राजकारणाला वैतागून अमेरिकेत गेलेल्या स्फोटक फलंदाजाने आपल्यातील धमाका दाखवून दिला आहे. उन्मुक्त चंद (Unmukt Chand) सध्या अमेरिकेतील मायनर क्रिकेट लीग (Minor Cricket League) मध्ये सिलिकॉन वॅली स्ट्रायकर्सचे प्रतिनिधीत्व करत आहे. शिकागो ब्लास्टर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार कामगिरीच्या जोरावर संघाला 9 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

या सामन्यात उन्मुक्त चंदने स्फोटक फलंदाजी करत 63 चेंडूत नाबाद 90 धावा कुटल्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार खेचले. त्याने 142 च्या स्ट्राइक रेटने धावा करत आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. उन्मुक्त चंदला वेस्ट इंडिजचा फलंदाज नरसिंह देवनारायण याची सुरेख साथ मिळाली. त्याने 30 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. या दोघांशिवाय श्रीलंकेच्या शेहान जयसूर्याने 20 धावांची खेळी केली.

हेही वाचा: टी-20 वर्ल्ड कप टीम सिलेक्शनवेळी रंगली धोनीची चर्चा

उन्मुक्त चंदने मायनर लीग क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत 8 सामन्यात 60.80 च्या सरासरीनं 304 धावा केल्या आहेत. यात त्याने 10 षटकार आणि 30 चौकार खेचले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 113 हून अधिक आहे. त्याने स्पर्धेत 3 अर्धशतके लगावली असून 90 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

हेही वाचा: बुमराह अँड कंपनी पाकिस्तानच्या त्या माऱ्याची बरोबरी करेल का?

19 वर्षाखालील भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंद (Unmukt Chand) ने अचानकपणे निवृत्ती घेतली होती. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतमध्ये उन्मुत्क चंदने मनातील खंतही व्यक्त केली होती. नेहमीच देशासाठी खेळायचे स्वप्न पाहिले. राज्य क्रिकेट मंडळातील अंतर्गत राजकारणामुळे दुसऱ्या ठिकाणी संधी शोधण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे त्याने स्पष्ट केले होते. बीसीसीआयला अलविदा केल्यानंतर अमेरिकेत क्रिकेट खेळवण्यास उत्सुक असल्याचे तो म्हणाला होता. त्याप्रमाणे तो आता अमेरिकेत क्रिकेटचा आनंद घेत आहे.

loading image
go to top