

Vaibhav Suryavanshi
esakal
चेस्टर ली स्ट्रीट - आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर आता भारताचा टी-२० संघ आजपासून (ता. १ जुलै) सुरू होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयाचा प्रयत्न करील. आयर्लंडप्रमाणे या मालिकेतही वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची उत्सुकता असून, चर्चाही सुरू आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत फलंदाजांचा कस लागला. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही याचा प्रत्यय येऊ शकणार आहे. अशा परिस्थितीत वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान देण्यात येईल का, हा प्रश्न या वेळी निर्माण झाला आहे.