वैभव सूर्यवंशी कॅप्टन म्हणून चमकला! भारताने 19 वर्षांपूर्वीचा पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

Vaibhav Suryavanshi : भारताच्या अंडर १९ संघानं वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या अंडर १९ संघाला यूथ वनडेत २७ धावांनी नमवलं. या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं विश्वविक्रम केला असून पाकिस्तानच्या खेळाडूचा विक्रम मोडला.
Vaibhav Suryavanshi Leads India U19 To Historic World Record

Vaibhav Suryavanshi Leads India U19 To Historic World Record

Esakal

Updated on

वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर १९ संघानं पहिल्या युथ वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अंडर १९ संघाला पराभूत केलं. सामन्यात भारतानं डकवर्थ लुईस निमयाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेला नमवलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद ३०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेनं ४ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. पण पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. शेवटी पाऊस न थांबल्यानं डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताला विजयी घोषीत करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com