

Vaibhav Sooryavanshi injury
ESakal
भारत 'अ' संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्रिकोणीय मालिका सुरू आहे. याच त्रिकोणीय मालिकेदरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. यजमान श्रीलंका 'अ' संघाविरुद्धच्या एका महत्त्वपूर्ण सामन्याच्या अगदी आधी, भारत 'अ' संघाचा युवा सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशी जखमी झाला आहे. या बातमीमुळे केवळ क्रिकेट चाहत्यांमध्येच नव्हे, तर संघ व्यवस्थापनातही चिंता वाढली आहे.