Video : आंद्रे रसेलची नजर हटी 'दुर्घटना' घटी | Video of Andre Russell freak runout in Bangladesh Premier League | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andre Russell freak runout

Video : आंद्रे रसेलची नजर हटी 'दुर्घटना' घटी

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेल (Andre Russell) जगभरातील टी २० लीग स्पर्धेत आपल्या चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीने रंगत आणत असतो. सध्या तो बांगलादेश प्रीमियर लीग खेळत आहे. काल शुक्रवारी खुलना टायगर्स आणि मिनिस्टर ग्रुप ढाका यांच्यात सामना झाला. या सामन्यात आंद्रे रसेल बाबात असे काही घडले की त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता आहे. (Video of Andre Russell freak runout in Bangladesh Premier League)

हेही वाचा: भारताचा अती आत्मविश्वासाने केला घात : ताहिर

खुलना टायगर्सचा गोलंदाज थिसारा परेराने (Thisara Perera) १५ व्या षटकात आंद्रे रसेलला षटकातील शेवटचा चेंडू टाकला. हा चेंडू रसेलने थर्ड मॅनच्या दिशेने टोलवला. या चेंडूवर आंद्रे रसेल आणि त्याचा पार्टनर मोहमदुल्ला यांनी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. स्ट्रायकर एंडला धावणाऱ्या मोहमदुल्लाला (Mahmudullah) बाद करण्यासाठी क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हीट थ्रो केला. तो थ्रो देखील स्टंपचा अचून वेध घेऊन गेला. मात्र मोहमदुल्ला क्रिजमध्ये परतला होता. त्यामुळे तो सेफ झाला.

हेही वाचा: IPL Mega Auction कडे 'या' खेळाडूंनी फिरवली पाठ!

मात्र चेंडू स्टंपला लागला आणि थेट नॉन स्ट्रायकर एंडला आंद्रे रसेलचे लक्ष नसतानाच स्टंपवर जाऊन आदळला. आंद्रे रसेल निवांत पळत होता. मात्र अनपेक्षित वळण घेतलेल्या त्या डायरेक्ट थ्रोने आंद्रे रसेलचा बळी घेतला. आंद्रे रसेल क्रिजमध्ये पोहचला नसल्याने त्याला धावबाद ठरवण्यात आले. (Andre Russell freak runout)

Web Title: Video Of Andre Russell Freak Runout In Bangladesh Premier League

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..