

कोल्हापूरमध्ये कुस्ती आणि क्रिकेटचे शौकीन पाहायला मिळतात, तसेच तिथे फुटबॉलचेही चाहते आहेत. त्यामुळे फुटबॉल सामनेही अगदी आवडीने इथं पाहिले जातात. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होणाऱ्या फुटबॉल सामन्यासाठी तर चाहते आवर्जून उपस्थित असतात. त्यांचा उत्साहही गगनाला भिडलेला असतो.
नुकतेच रविवारी (१६ फेब्रुवारी) के एस ए वरिष्ठ लीगमध्ये पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात रंगलेल्या सामन्यासाठी हजारो फुटबॉल चाहत्यांची गर्दी दिसून आली. ही गर्दी पाहून हा सामना एखाद्या वर्ल्डकपचा सामना असावा असं चित्र दिसत होतं.
स्थानिक सामन्यालाही होणारी ही गर्दी अचंबित करणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सामने पाहण्यासाठी महिला वर्ग देखील मोठी गर्दी करतो. अशात महिला वर्ग देखील मोठी गर्दी करतो. त्यामुळे मोठ्या प्रामाणात पोलीस बंदोबस्तही तैनात असतो.