

Vinesh Phogat Breaks Silence on Brij Bhushan Singh Acquittal
Sakal
Vinesh Phogat Breaks Silence on Brij Bhushan Singh Acquittal : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या बृजभूषण शरण सिंह यांची सोमवारी (३ ऑगस्ट) निर्दोष मुक्ताता झाली आहे. दिल्लीतील राउज अव्हेन्यू कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिला असून त्यांना सबळ पुराव्याअभावी दोषमुक्त करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
याबाबत आता भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने टीका केली आहे. तसेच तिने यापुढेही त्यांच्याविरुद्ध लढत राहू असा निर्धारही व्यक्त केला आहे.