Video: पार्किसन्सचा 'सुपर-स्पिन'; पाकिस्तानी फलंदाजही अवाक

Video: पार्किसन्सचा 'सुपर-स्पिन'; पाकिस्तानी फलंदाजही अवाक ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळायला इमामने पाय बाहेर काढला अन्...
Video: पार्किसन्सचा 'सुपर-स्पिन'; पाकिस्तानी फलंदाजही अवाक

ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळायला इमामने पाय बाहेर काढला अन्...

इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत ३-० असा विजय मिळवला. आधीच दोन सामने जिंकलेला इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यात पराभूत होतो की काय अशी शंका चाहत्यांना आली होती. पण इंग्लंडच्या मधल्या फळीतील जेम्स विन्सने तळाच्या लेव्हिस ग्रेगोरी सोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ३३२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था ५ बाद १६५ झाली होती. पण विन्सचे शतक (१०२) आणि ग्रेगोरीचे अर्धशतक (७७) यांनी संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती जेम्स पार्किसन्सने टाकलेल्या जादुई चेंडूची... त्याने पाकिस्तानच्या इमाम उल हकला अशा पद्धतीने क्लीन बोल्ड केलं की इमाम स्वत:देखील आश्चर्यचकित झाला. (Viral Video Matt Parkinson clean bowled Pakistani Imam Ul Haq with Super Spin)

Video: पार्किसन्सचा 'सुपर-स्पिन'; पाकिस्तानी फलंदाजही अवाक
मुंबईचा माजी क्रिकेटपटू म्हणतो, 'धवन T20 World Cup खेळणं कठीणच'

पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी २६ वे षटक पार्किसन्स टाकत होता. इमाम उल हक त्यावेळी ५६ धावांवर खेळत होता. पार्किसन्सला पाकिस्तानची इमाम-बाबर भागीदारी तोडण्यासाठीच गोलंदाजी देण्यात आली होती. त्याने त्याला दिलेली कामगिरी चोख पार पाडली. इमाम उल हक याला त्याने ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू टाकला. तो चेंडू खेळण्यासाठी इमामने पाय बाहेर आणला. त्या नादात इमामच्या बॅट आणि पायात खूप अंतर शिल्लक राहिले. चेंडू टप्पा पडून पटकन वळला आणि अंतरामधून जाऊन थेट स्टंपवर आदळला. आपण क्लीन बोल्ड झालोय हे सुरूवातीला इमामलाही कळलं नाही. पण नंतर हा प्रकार समजल्यावर तोदेखील आश्चर्यचकित होत माघारी परतला.

पाहा व्हिडीओ-

Video: पार्किसन्सचा 'सुपर-स्पिन'; पाकिस्तानी फलंदाजही अवाक
इंग्लंडची 'विम्बल्डन फायनल' अन् मुंबई हायकोर्ट.. वाचा रंजक किस्सा

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ३३१ धावा केल्या होत्या. त्यात कर्णधार बाबर आझमच्या दमदार शतकाचा समावेश होता. बाबर आझमने १३९ चेंडून १५८ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यात १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याला ७४ धावा करणाऱ्या मोहम्मद रिझवानने आणि इमाम उल हकने चांगली साथ दिली. या तिघांच्या खेळीच्या जोरावरच पाकिस्तानने ३३१ धावा केल्या. पण इंग्लंडने मात्र १२ चेंडू आणि ३ गडी राखून सामना आपल्या नावे केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com