INDvsAUS : 'शर्माजी का बेटा छा गया'; रोहितने शतकी खेळीत केले 5 विक्रम!

Rohit-Sharma
Rohit-Sharma

बंगळूर : येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये विक्रमांची नोंद होण्यास सुरवात झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या सलामीवीरांनी जोरदार सुरवात केली. संघाचे धावफलकावर 71 धावा जमा झाल्या तेव्हा के.एल.राहुल 19 धावांवर पायचित झाला. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

9000 and counting.... @rohitsharma45 breaches the 9K mark in ODIs 

A post shared by Team India (@indiancricketteam) on

तत्पूर्वी, इनिंगच्या दुसऱ्या षटकांतच रोहितने चौथी धाव घेत माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडत धडाक्यात सुरवात केली. रोहितने पहिल्यांदा गांगुलीचा आणि त्यानंतर सध्याचा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीचा विक्रम मोडला. वनडे क्रिकेट सामन्यात 9 हजार धावांचा टप्पा गाठणारा तो सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच क्रिकेट विश्वात सर्वात जलद 9 हजार धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरण्याचा बहुमान त्याने मिळविला आहे. 

रोहितने 217 डावांमध्ये ही कामगिरी पार पाडली. सौरव गांगुली (228 डाव), सचिन तेंडुलकर (235 डाव), विराट कोहली (194 डाव) आणि दक्षिण आफ्रिकेचा तुफानी फलंदाज एबी डिव्हिलिअर्स (205 डाव) यांनी हा कारनामा याआधी केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध... 

त्यानंतर रोहितने वर्षातलं पहिलं, ऑस्ट्रेलियाविरुद्धचं 8वं आणि कारकीर्दीतील 29 व्या शतकाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जास्त शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसरा भारतीय ठरला आहे. या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतके, तर विराट कोहलीने 8 झळकावली आहेत. याबरोबरच रोहितने विराटच्या 8 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या यादीतही तो दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्याने विराट कोहलीला (15 वेळा) मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकर (24 वेळा) या यादीत अव्वलस्थानी आहेत.

एक असाही विक्रम

दरम्यान, 128 चेंडूचा सामना करताना त्याने 8 चौकार आणि 6 षटकार लगावत 119 धावांची खेळी केली. मात्र, एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो झॅम्पाच्या गोलंदाजीवर स्टार्ककडे झेल देत बाद झाला. झॅम्पाने त्याने पाचव्यांदा बाद केले आहे. या आधी लायन आणि सँटनर यांनी रोहितला 5 वेळा बाद केले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

H.I.T.M.A.N  No better sight than a Rohit Sharma show  #TeamIndia #INDvAUS @paytm

A post shared by Team India (@indiancricketteam) on

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com