Virat Kohli : सचिन, धोनी पाठोपाठ विराट-अनुष्काला मिळाली रामलल्लाची निमंत्रणपत्रिका, अयोध्येशी आहे खास नातं

Virat Kohli received the invitation for the Ram Temple Pran Pratishtha at Ayodhya marathi news
Virat Kohli received the invitation for the Ram Temple Pran Pratishtha at Ayodhya marathi news

Virat Kohli Anushka Sharma Invited For Ram Mandir in Ayodhya : अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर यांना निमंत्रण पत्रे दिली जात आहेत. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

कोहलीशिवाय वर्ल्ड कप विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह हजारो प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत.

Virat Kohli received the invitation for the Ram Temple Pran Pratishtha at Ayodhya marathi news
Shreyas Iyer : 'मला जे सांगितलं गेलं ते मी केलं...' टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर अय्यरची पहिली प्रतिक्रिया

राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी आमंत्रित केलेला कोहली हा पाचवा क्रिकेटपटू आहे. वृत्तानुसार, निमंत्रण स्वीकारण्यासाठी कोहली भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर थेट मुंबईला गेला होता. दुसरा सामना इंदूरमध्ये झाला.

दरम्यान, निमंत्रण मिळाल्यानंतर कोहली मंगळवारी बंगळुरूला रवाना झाला. अफगाणिस्तान विरुद्धचा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बुधवारी (17 जानेवारी) बेंगळुरू येथे खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

काही दिवस आधी दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सामन्यादरम्यान राम भजन ऐकताच कोहली नाचू लागला होता. आधी त्याने मैदानात धनुष्यबाणाची अ‍ॅक्शन केली आणि त्यानंतर हात जोडून प्रेक्षकांना अभिवादन करतो. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

विराट कोहलीची देवावर नितांत श्रद्धा आहे, तो अनेकदा आपल्या कुटुंबासोबत धार्मिक स्थळांना भेट देतो. पण इथे आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. खरंतर, विराट कोहलीचे अयोध्येशी अनोखे नाते आहे. खरं तर रामललाच्या जन्मस्थानासोबतच अयोध्या हे कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचेही जन्मस्थान आहे. अनुष्काचा जन्म 1 मे 1988 रोजी अयोध्या, यूपी येथे झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com